Mukesh Ambani: रिलायन्स ग्रुपचे प्रमुख मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण, तुम्हाला माहित आहे का की, रिलायन्स ग्रुपमध्ये एक असा कर्मचारी आहे, ज्याचा पगार मुकेश अंबानी यांच्या वार्षिक पगारापेक्षा 9 कोटी रुपये जास्त आहे. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्याचे रिलायन्सची क्रिकेट फ्रँचायझी मुंबई इंडियन्सशीही खास नाते आहे. या व्यक्तीचे नाव निखिल मेसवानी आहे.
रिलायन्स ग्रुपमध्ये मोठा माननिखिल मेसवाली मुंबई इंडियन्सचे डे टू डे वर्क पाहतात. मेसवानी हे अशा लोकांपैकी एक आहेत, ज्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला पुढे नेण्यात खूप मेहनत घेतली आहे. निखिल यांचा मोठा भाऊ हितल मेसवानी हेदेखील कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत. निखिल मेसवानी यांचे वडील रसिकलाल मेसवानी हे धीरूभाई अंबानी यांचे नात्याने भाऊ आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संस्थापक संचालकांपैकी एक आहेत. मेसवानी कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीच्या वाढीचा आणि यशाचा अविभाज्य भाग आहे.
वार्षिक वेतन 24 कोटी रुपये मेसवानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजमधील उच्चपदस्थ अधिकारी आहेत. मेसवानी हे मुकेश अंबानी यांचे भाऊ असून ते 1986 पासून कंपनीत आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षात त्यांनी 24 कोटी रुपयांची कमाई केली, जी मुकेश अंबानींच्या कमाईपेक्षा खूप जास्त आहे. अंबानींचा पगार 10 वर्षांहून अधिक काळापासून 15 कोटींवर आहे. कोविड-19 महामारीच्या संकटात इतरांना मदत करण्यासाठी त्यांनी आपला पगारही सोडला आहे.
या प्रकल्पांमध्ये मेसवानींचा सहभागमेसवानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालकांपैकी एक आहेत आणि कंपनीच्या यशात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रकल्प अधिकारी म्हणून सुरुवात केली आणि काही काळातच कार्यकारी संचालक बनले. मेसवानी यांनी जामनगर रिफायनरीसह कंपनीच्या अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कंपनीच्या दूरसंचार आणि रिटेल क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा होता.