Lokmat Money >गुंतवणूक > Credit Card Use : केवळ पेमेंटसाठीच नाही, तर असाही क्रेडिट कार्डाचा करा बेस्ट वापर

Credit Card Use : केवळ पेमेंटसाठीच नाही, तर असाही क्रेडिट कार्डाचा करा बेस्ट वापर

तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 02:07 PM2023-04-22T14:07:45+5:302023-04-22T14:08:05+5:30

तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते.

Not only for payment but also make the best use of credit card emi reward points credi score | Credit Card Use : केवळ पेमेंटसाठीच नाही, तर असाही क्रेडिट कार्डाचा करा बेस्ट वापर

Credit Card Use : केवळ पेमेंटसाठीच नाही, तर असाही क्रेडिट कार्डाचा करा बेस्ट वापर

तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. आतापर्यंत तुम्ही फक्त बिल भरण्यासाठी क्रेडिट वापरत असाल. पण तुम्हाला माहीत आहे का तुम्ही त्याचा अन्य पद्धतींनीही वापर करू शकता. तुम्ही आणखी कोणत्या कामांसाठी क्रेडिट कार्डाचा वापर करू शकता आणि त्याचे काय फायदे होती याची माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.

आपण अनेकदा क्रेडिटने खरेदी करतो आणि अनावश्यक खर्च करतो. नंतर अनेकदा त्याचा आपल्यालाच त्रास होतो. अशा परिस्थितीत आपण त्याचा योग्य वापर करू शकत नाही.

मिळतो ग्रेस पीरिअड
क्रेडिट कार्डचा सर्वात चांगला फायदा म्हणजे त्यात तुम्हाला ग्रेस पीरिअड मिळतो. तुम्ही आपल्या गरजेनुसार क्रेडिट कार्डाचा वापर केला असेल आणि त्याच महिन्यात पैसे भरले तर त्यावर तुम्हाला व्याज द्यावं लागत नाही, हा त्याचा सर्वात चांगला फायदा आहे. ग्रेस पीरिअड १८ ते ५५ दिवसांचा असतो.

क्रेडिट स्कोअर सुधारतो
जर तुम्ही क्रेडिट कार्डचं पेमेंट वेळेवर केलं तर त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर मजबूत होतो. याचा थेट तुमच्या क्रेडिट लिमिटवर परिणाम होतो. हे तुम्हाला भविष्यात कधीतरी कर्ज घेण्यास मदत करते.

रिवॉर्ड पॉईंट्स आणि कॅशबॅक
जर तुम्ही क्रेडिट कार्ड अनेकदा वापरत असाल तर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्स, गिफ्ट कार्ड्स आणि अनेक व्हाउचर आणि त्यावर प्रचंड सूट मिळत राहते.

ईएमआयची सुविधा
जर तुम्हाला एखादी महागडी वस्तू घ्यायची असेल आणि तुमच्या बजेटमुळे तुम्हाला संपूर्ण रक्कम भरता येत नसेल, तर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे ईएमआयवर तुमची वस्तू खरेदी करू शकता. जे तुम्ही दरमहा हप्ता म्हणून भरू शकता. बँका तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयची सुविधा देखील देतात आणि ही ३ ते ९ महिन्यांच्या ईएमआयसाठीदेखील असू शकते.

Web Title: Not only for payment but also make the best use of credit card emi reward points credi score

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.