Lokmat Money >गुंतवणूक > आता घरबसल्या पाहा 'नॅशनल पेन्शन स्कीम' अकाऊंट बॅलन्स, 'या' स्टेप्स करा फॉलो

आता घरबसल्या पाहा 'नॅशनल पेन्शन स्कीम' अकाऊंट बॅलन्स, 'या' स्टेप्स करा फॉलो

नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) ही सरकारद्वारे चालवली जाणारी एक योजना आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 02:17 PM2023-08-24T14:17:03+5:302023-08-24T14:17:34+5:30

नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) ही सरकारद्वारे चालवली जाणारी एक योजना आहे

Now check National Pension Scheme account balance at home follow these steps umang app nsdl sms details | आता घरबसल्या पाहा 'नॅशनल पेन्शन स्कीम' अकाऊंट बॅलन्स, 'या' स्टेप्स करा फॉलो

आता घरबसल्या पाहा 'नॅशनल पेन्शन स्कीम' अकाऊंट बॅलन्स, 'या' स्टेप्स करा फॉलो

नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) ही सरकारद्वारे चालवली जाणारी एक योजना आहे, जी निवृत्तीनंतरच्या चांगल्या आर्थिक भविष्यासाठी तयार केली गेली आहे. एनपीएस ही जगातील सर्वात स्वस्त पेन्शन योजना मानली जाते. या योजनेत १८ ते ७० वर्षे वयापर्यंत योगदान दिलं जाऊ शकतं. यावर अनेक प्रकारचे कर लाभ उपलब्ध आहेत, ज्यामध्ये निवृत्तीनंतर तुमच्या भविष्यासाठी एक मोठा फंड तयार केला जातो. एनपीएस खात्यातील शिल्लक तपासत राहणं आवश्यक आहे आणि आता तुम्ही घरी बसून तुमची एनपीएसमधील शिल्लक ऑनलाइन सहज तपासू शकता.

NSDL वेबसाइटवरून कसं तपासाल

  • सर्वप्रथम NSDL पोर्टलवर जा.
  • लॉग इन केल्यानंतर तुम्ही PRAN म्हणजेच पर्मनंट अकाऊंट नंबर युझर आयडीमध्ये आणि पासवर्ड म्हणून वापरा.
  • त्यानंतर कॅप्चा कोड टाक.
  • ट्रान्झॅक्शन स्टेटमेंटमध्ये Holding Statement च्या पर्यायावर क्लिक करा.
     

एसएमएसद्वारे कसं पाहाल
तुमच्या NPS रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून ९२१२९९३३९९ वर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक रकमेचे सर्व तपशील असलेला एसएमएस मिळेल. नॅशनल पेन्शन योजनेशी संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी तुम्ही (०२२) २४९९ ३४९९ वर कॉल करून कस्टमर सर्व्हिसेसशी बोलू शकता.

UMANG अॅपवर असा चेक करा बॅलन्स

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर उमंग अॅप डाउनलोड करा.
  • त्यात लॉग इन केल्यानंतर, NPS वर जा
  • NPS वर स्विच केल्यानंतर तुमची सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सी (CRA) निवडा
  • एक पेज ओपन केल्यानंतर त्यात Current Holding चा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुमचा परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PRAN) आणि पासवर्ड टाका
  • सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लॉग इन करा, मग तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक पाहू शकाल.

Web Title: Now check National Pension Scheme account balance at home follow these steps umang app nsdl sms details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.