EPFO Update: देशात सामाजिक सुरक्षा योजना (Social Security Scheme) चालवणाऱ्या EPFO ने 2018-19 ते 2023-24 या आर्थिक वर्षात खातेधारकांना निष्क्रिय खात्यांमध्ये जमा केलेले 16437 कोटी रुपये परत केले आहेत. तरीदेखील, EPFO कडे अशी अजून 80 लाखांहून अधिक नॉन-ऑपरेटिव्ह खाती आहेत, ज्यात गुंतवणूकदारांचे कष्टाचे 28670 कोटी रुपये जमा आहेत. केंद्र सरकारने संसदेत ही माहिती दिली आहे.
EPF मध्ये अनक्लेम्ड अकाउंट नाही
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान लोकसभा खासदार मनीष तिवारी आणि असदुद्दीन ओवेसी यांनी कामगार आणि रोजगार मंत्र्यांना गेल्या पाच वर्षात किती निष्क्रिय ईपीएफ खाती (इनऑपरेटिव्ह एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अकाऊंट्स) विचारली आणि या खात्यांमध्ये जमा केलेल्या दावा न केलेल्या रकमेची माहिती विचारली. तसेच ईपीएफओ नॉन-ऑपरेटिव्ह खात्यात जमा केलेली रक्कम संबंधित लाभार्थीला परत करेल का? या प्रश्नाला उत्तर देताना कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या की, ईपीएफमध्ये हक्क नसलेली खाती नाहीत. तर, EPF योजना 1952 च्या नियमांनुसार, काही खाती निष्क्रिय खाती घोषित करण्यात आली आहेत.
28,669.32 कोटी रुपये नॉन-ऑपरेटिव्ह खात्यांमध्ये जमा
कामगार राज्यमंत्र्यांच्या उत्तरातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2018-19 ते 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण नॉन-ऑपरेटिव्ह ईपीएफ खात्यांची संख्या 80,84,213 आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदारांनी 28,669.32 कोटी रुपये जमा केले. 2018-19 मध्ये 6,91,774 नॉन-ऑपरेटिव्ह ईपीएफ खाती होती, ज्यात 1638.37 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. तर, 2019-20 मध्ये, खात्यांची संख्या 9,77,763 पर्यंत वाढली, या खात्यांमध्ये 2827.29 कोटी रुपये जमा झाले.
याशिवाय, 2020-21 मध्ये खात्यांची संख्या 11,72,923 होती आणि जमा केलेली रक्कम 3930.8 कोटी रुपये होती. तर, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, खात्यांची संख्या 13,41,848 होती आणि एकूण जमा रक्कम 4962.70 कोटी रुपये होती. 2022-23 मध्ये नॉन-ऑपरेटिव्ह ईपीएफ खात्यांची संख्या 17,44,518 पर्यंत वाढली, तर यात जमा केलेली रक्कम 6804.88 रुपये होती. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, नॉन-ऑपरेटिव्ह ईपीएफ खात्यांची संख्या 21,55,387 पर्यंत वाढली आणि त्यामध्ये जमा केलेली रक्कम 8,505.23 कोटी रुपयांवर पोहोचली.
जमा केलेली रक्कम लाभार्थ्यांना परत केली जाईल
शोभा करंदलाजे म्हणाल्या की, निष्क्रिय खात्यांमध्ये जी काही रक्कम पडून असेल, ती रक्कम ईपीएफओ संबंधित लाभार्थीला परत करेल. आर्थिक वर्ष 2018-19 पासून ते 2023-24 या आर्थिक वर्षात 16436.91 कोटी रुपये निष्क्रिय EPF खात्यात जमा करण्यात आले, ज्याची पुर्तता झाली आहे. कामगार मंत्र्यांनी सभागृहाला सांगितले की, सर्व नॉन-ऑपरेटिव्ह खात्यांमध्ये निश्चित दावेदार असतात आणि जेव्हा जेव्हा अशा कोणत्याही सदस्याने ईपीएफओकडे दावा दाखल केला जातो, तेव्हा तो तपासानंतर निकाली काढला जातो. 2019-20 ते 2023-24 या आर्थिक वर्षात अंतिम निकालासह एकूण 313.55 लाख दावे (फॉर्म 19/20) निकाली काढण्यात आले आहेत. तर एकूण 312.56 लाख हस्तांतरण प्रकरणे (फॉर्म 13) प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.