NVIDIA CEO Jensen Huang: जगातील अब्जाधीशांचा विषय निघाल्यावर तुमच्या मनात इलॉन मस्क, जेफ बॉस, बर्नार्ड अर्नोल्ड आणि मुकेश अंबानी यांसारख्या लोकांची नावे येतील. पण, या नावांव्यतिरिक्त असे एक नाव आहे, जे सध्या चर्चेत आले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, एकेकाळी वेटर म्हणून काम करणाऱ्या या माणसाने गेल्या चार महिन्यांत एवढी कमाई केली की, जगातील अब्जाधीश मागे पडले आहेत.
चार महिन्यांत $29.2 अब्जांची कमाईहा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून, AI चिप्स बनवणाऱ्या अमेरिकन कंपनी Nvidia Corp चे संस्थापक आणि CEO जेन्सेन हुआंग आहेत. जेन्सेन यांनी या वर्षी, म्हणजे गेल्या चार महिन्यांत $29.2 अब्ज रुपये कमावले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी 2024 मध्ये आतापर्यंत कमाईच्या बाबतीत अनेक दिग्गजांना मागे टाकले. जेन्सेन हुआंग जगातील अब्जाधीशांच्या यादीत 73.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 20 व्या क्रमांकावर आहे, परंतु गेल्या चार महिन्यांतील त्याच्या कमाईने त्याने जगातील अव्वल अब्जाधीशांनाही मागे टाकले आहे.
कमाईत सर्वात पुढे2024 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये जेन्सेन हुआंग पहिल्या स्थानावर आहे, तर मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या चार महिन्यांत त्यांनी 28.3 अब्ज डॉलरची कमाई केली आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ॲमेझॉनचे जेफ बेझोस आहेत, ज्यांनी 24.3 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. Nvidia च्या शेअर्समध्ये सतत वाढ होत असल्याने जेन्सेनची कमाई झपाट्याने वाढली आहे. त्यांची कंपनी NVIDIA ही मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल नंतर जगातील तिसरी सर्वात मौल्यवान कंपनी आहे. Nvidia चे मार्केट कॅप दोन ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे.
एकेकाळी वेटर म्हणून काम करायचेNVIDIA सुरू करण्यापूर्वी जेन्सेन हुआंग वेटर म्हणून काम करत होते. 1963 मध्ये तैवानमध्ये जन्मलेल्या जेन्सेनचे बालपण तैवान आणि थायलंडमध्ये गेले. त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी 1973 मध्ये अमेरिकेत नातेवाईकांकडे पाठवले. अभ्यासानंतर त्यांनी काही महिने रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम केले. 1993 मध्ये त्यांनी Nvidia ची स्थापना केली. त्यांनी पहिले ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट तयार केले. एक वेळ अशी आली की, त्यांची कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली. पण, त्यांनी मोठ्या कष्टाने केवळ कंपनी सांभाळली नाही, तर जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आणले.