Join us  

एकीकडे कर्मचारी कपात; दुसरीकडे ‘बॉस’ मालामाल; सर्वाधिक पगार घेणारा सीईओ कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 2:52 PM

टेस्ला, ट्विटर, स्पेसएक्स यांसारख्या कंपन्यांचे सीईओ इलाॅन मस्क हे पहिल्या क्रमांकावर आहे

न्यूयॉर्क : आयटी क्षेत्रात गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. याशिवाय पगारही कमी केले आहेत. ‘गुगल’मध्येही हीच अवस्था आहे. या कालावधीत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना सुमारे २२६ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १९ अब्ज रुपये एवढा पगार देण्यात आला. सामान्य कर्मचाऱ्यांच्या पगारांच्या तुलनेत हा आकडा ८०० पट अधिक आहे. मात्र, एवढा पगार मिळूनही ते सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० सीईओंच्या यादीतही नाहीत. या यादीत कोण आहेत, हे जाणून घेऊया. 

टेस्ला, ट्विटर, स्पेसएक्स यांसारख्या कंपन्यांचे सीईओ इलाॅन मस्क हे पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांना सुमारे २३ अब्ज डाॅलर्स एवढे वेतन वर्ष २०२२ मध्ये देण्यात आले. खालील सीईओंच्या पगाराची आकडेवारी डॉलर अब्ज रुपयांत.

इलॉन मस्क १८८

रॉबर्ट स्कारिंज रिव्हिओ ऑटोमोटिव्ह - १६४

टीम कुक ॲपल - ६९

पीटर रॉलिंसन  ल्युसिड - ४७टॉम सायबेल   सीएआय - २८

सूनाबी कोटी - २३

जोबे केकेआर - २२.८

टोमर वेंगार्टन सेंटिलनल वन - २२

एलेक्स कार्प पालांटिर टेक - २१ 

सिड सिजब्रांडिज गिटलॅब -२१ 

टॅग्स :एलन रीव्ह मस्क