Join us  

सोमवारपासून स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, १ ग्राम सोन्यासाठी द्यावे लागणार ५९२३ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 1:48 PM

सोन्यात गुंतवणूक करणं हे नेहमीच फायद्याचे ठरले आहे. सोन्याच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे.

Sovereign Gold Bond: सोन्यात गुंतवणूक करणं हे नेहमीच फायद्याचे ठरले आहे. सोन्याच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे. तुम्हालाही सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर सरकारने सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGB) योजनेची दुसरी सीरिज आणली आहे. बाजारभावाच्या तुलनेत गोल्ड बॉन्ड स्वस्त आहेत आणि ऑनलाइन खरेदीवरही त्यात सूट दिली जात आहे.

सॉवरेन गोल्ड बॉन्डची २०२३ ची सीरिज २ ही ११ सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठीखुली होणार आहे आणि १५ सप्टेंबर २०२३ रोजी बंद होईल. रिझर्व्ह बँकेनं सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना २०२३-२४ च्या सीरिज २ ची सेटलमेंट डेट २० सप्टेंबर २०२३ निश्चित केली आहे. सोवरेन गोल्ड बॉन्डच्या पहिल्या सीरिजचं सबस्क्रिप्शन १९ ते २३ जूनदरम्यान सुरू करण्यात आलं होतं. 

२०२३-२४ सीरिज २ स्कीमरिझर्व्ह बँकेच्या १४ जून २०२३ च्या सर्क्युलरनुसार सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना २०२३-२३ च्या सीरिज २ चं सबस्क्रिप्शन ११ ते १५ सप्टेंबरदरम्यान सुरू राहणार आहे. गोल्ड बॉन्डचं मूल्य सबस्क्रिप्शनच्या पूर्वीच्या कालावधीचं म्हणजे ६,७ आणि८ सप्टेंबर रोजीची सोन्याची प्रति ग्राम किंमत ५९२३ रुपये होती.

ऑनलाइन पेमेंटमध्ये सूटरिझर्व्ह बँकेनुसार ऑनलाइन पेमेंट करणारे आणि डिजिटल मोडच्या माध्यमातून पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकरांना यात ५० रुपयांची सूट मिळणार आहे. यानंतर गोल्ड बॉन्डचं मूल्य ५८७३ रुपये प्रति ग्राम होईल.

कुठून खरेदी करालसॉवरेन गोल्ड बाँडनुसा ते लिस्टेड कमर्शिअल बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), पोस्ट ऑफिस आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड यांच्यामार्फत विकले जाणार आहे.

टॅग्स :सोनंभारतीय रिझर्व्ह बँक