Lokmat Money >गुंतवणूक > SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी ₹10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला...

SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी ₹10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला...

Power of SIP: जुलै महिन्यात गुंतवणूकदारांनी SIP मध्ये 23,332 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 07:24 PM2024-08-23T19:24:40+5:302024-08-23T19:24:51+5:30

Power of SIP: जुलै महिन्यात गुंतवणूकदारांनी SIP मध्ये 23,332 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक केली आहे.

Own ₹10 crore at age 50 through SIP; Know the formula for getting rich | SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी ₹10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला...

SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी ₹10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला...

Power of SIP : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करुन किरकोळ गुंतवणूकदार SIP द्वारे भरपूर पैसे कमवत आहेत. जुलै महिन्यात देशभरातील लोकांना एसआयपीमध्ये 23,332 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक केली आहे. तज्ज्ञांच्या मते दीर्घकाळ एसआयपी सुरू ठेवल्यास चांगला निधी निर्माण होऊ शकतो. यामध्ये कम्‍पाउंडिंगसोबतच रुपी कॉस्‍ट एवेजिंगचाही फायदा होतो. कमी कालावधीत तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यसाठी स्टेप-अप एसआयपीचा पर्याय खूप उपयुक्त ठरतो. स्टेप-अप SIP द्वारे तुम्ही 25 वर्षात 10 कोटी रुपयांचा निधी जमवू शकता.

SIP: 25 वर्षात 10 कोटी-

समजा तुमचे वय 25 वर्षे आहे. तुम्ही दरमहा रु. 25,000 ची SIP सुरू केली आणि दरवर्षी त्यात 10% वाढ केली. तर, स्टेप अप एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार, तुम्हाला दरवर्षी सरासरी 12 टक्के परतावा मिळाल्यास पुढील 25 वर्षांमध्ये, म्हणजेच तुमच्या वयाच्या 50 व्या वर्षी तुम्ही सुमारे 10.68 कोटी (10,68,88,653) रुपयांचे मालक व्हाल. यामध्ये तुमची गुंतवणूक 2,95,04,118 रुपये असेल आणि अंदाजे भांडवली नफा 7,73,84,535 रुपये असेल.

बीपीएन फिनकॅपचे संचालक ए.के निगम म्हणतात, दीर्घ मुदतीत मोठा निधी उभारण्यासाठी एसआयपी हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना कम्‍पाउंडिंगचा लाभ मिळतो, तसेच कॉस्‍ट एवेजिंगचा फायदा होतो. SIP गुंतवणूकदारांना सल्ला दिला जातो की, उत्पन्न वाढीबरोबरच त्यांनी दरवर्षी गुंतवणुकीची रक्कमही वाढवावी. तसेच, तुम्ही दरवर्षी तुमच्या गुंतवणुकीचा आढावा घ्यावा.

SIP मधून विक्रमी आवक
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार, जुलै 2024 मध्ये SIP द्वारे 23,332 कोटी रुपयांचा विक्रमी आवाक नोंदवली गेली. यापूर्वी जूनमध्ये गुंतवणूकदारांनी एसआयपीद्वारे 21,262 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तसेच, एसआयपीची मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (एयूएम) 12.43 लाख कोटी रुपयांवरून 13.10 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. 

(टीप: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराची मदत घ्या.)


 

Web Title: Own ₹10 crore at age 50 through SIP; Know the formula for getting rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.