Join us  

स्पोर्ट्स ड्रिंक्सपासून ते प्रीमियम ड्राय फ्रूट्सपर्यंत; पतंजलीने लॉन्च केले 14 नवीन प्रोडक्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 4:06 PM

Patanjali New Products 2023 List : पतंजली फूड्स लिमिटेडने सर्व वर्गीयांसाठी प्रोडक्ट्स लॉन्च केली आहेत.

Patanjali New Products 2023 List :  योग गुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांची कंपनी 'पतंजली फूड्स लिमिटेड' (Patanjali Foods Limited) ने अनेक नवीन प्रोडक्ट्स लॉन्च केली आहेत. कंपनीने न्यूट्रास्युटिकल्स, हेल्थ बिस्किट, न्यूट्रेला मिलेट बेस्ड प्रोडक्ट आणि प्रीमियम ड्राय फ्रूट्समध्ये नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. 

कंपनीने विविध ग्राहक वर्गांसाठी एकूण 14 नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणली आहेत. खेळाशी निगडित लोकांसाठी कंपनीने Nutrela Sports लॉन्च केले आहे. यात स्पोर्ट्स ड्रिंक्स, स्पोर्ट्स व्हिटॅमिन आणि मिनरल सप्लिमेंट्सचा समावेश आहे. याशिवाय कंपनीने Nutrela Max Millets आणि Nutrela MaxxNuts देखील लॉन्च केले आहेत.

Nutrela क्रीडास्पोर्ट्स न्यू्ट्रिशन प्रोडक्ट्सची मागणी वेगाने वाढत आहे. इंडियन स्पोर्ट्स न्यूट्रिशन इंडस्ट्री 2028 पर्यंत 18% च्या CAGR दराने वाढण्याची अपेक्षा आहे. ही इंडस्ट्री 8,000 कोटी रुपयांची असेल. याचा फायदा घेण्यासाठी पतंजली फूड्सने न्यूट्रेला स्पोर्ट्स लॉन्च केले आहे. यात 6 उत्पादने आणि 19 SKU आहेत. यात स्पोर्ट्स ड्रिंक्स आणि स्पोर्ट्स व्हिटॅमिनसह मिनरल सप्लिमेंट्सचा समावेश आहे.

न्यूट्रेला मॅक्स मिलेट्सNutrela ने Max Millets लॉन्च केले आहे. भारतीय बाजारपेठेत सोया चंक्स लॉन्च करणारा हा भारतातील पहिला सुपरफूड ब्रँड आहे. आता कंपीने मिलेट्स आणले आहे. Nutrela Max Millets Ragi Choco Cereals या ब्रँड अंतर्गत लाँच करण्यात आली आहे. कंपनी मिलेट्सवर आधारित प्रोडक्ट्सची रेंज सुरू करण्याची योजना आखत आहे. नुट्रेला मॅक्स मिलेट्स रागी चोको 7 सुपर ग्रेन्सपासून बनवले आहे. यात नाचणी, ज्वारी, ओट्स, गहू, तांदूळ, मका आणि हरभरा आहे. 

प्रीमियम हेल्दी बिस्किटपतंजली फूड्स लिमिटेडने प्रिमियमायझेशन ड्राइव्हचा भाग म्हणून तीन नवीन बिस्किटे लॉन्च केली आहेत. ही रागी बिस्किट, 7-ग्रेन बिस्किट आणि डायजेस्टिव्ह बिस्किट आहेत. डायजेस्टिव्ह बिस्किटे ही भारतात आधीच एक मोठी उत्पादन श्रेणी आहे. पण 7-ग्रेन बिस्किट आणि रागी बिस्किट प्रीमियम ग्राहक वर्गाच्या आरोग्यदायी स्नॅकिंग पर्यायांच्या गरजा पूर्ण करतात. 

टॅग्स :पतंजलीव्यवसायगुंतवणूक