Join us

LIC च्या पॉलिसीत जमा करा २६० रुपये, मॅच्युरिटीवर मिळणार ५४ लाख; सोबतच हे फायदेही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 7:57 PM

देशातील बहुतेक लोक भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) हा गुंतवणूकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय मानतात.

LIC Jeevan Labh Maturity Calculator: देशातील बहुतेक लोक भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) हा गुंतवणूकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय मानतात. एलआयसी ग्राहकांच्या प्रत्येक गरजा लक्षात घेऊन विमा पॉलिसी आणते. LIC मध्ये, तुम्ही तुमच्या गरजेनुसार प्रीमियम रक्कम, पेमेंटची वेळ आणि मॅच्युरिटी वेळ निवडू शकता. येथे तुम्हाला एलआयसीच्या अशाच एका पॉलिसीबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये कुटुंबाच्या सुरक्षेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे.

LIC ची जीवन लाभ पॉलिसी एक मर्यादित प्रीमिअम पेमेंट नॉन लिंक्ड प्रॉफिट एंडोमेंट प्लॅन आहे. ही योजना मुदतपूर्तीपूर्वी कोणत्याही वेळी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक सहाय्य प्रदान करते आणि हयात असलेल्या पॉलिसीधारकाला मोठा फंड मिळतो. एक प्रकारे, या पॉलिसीमध्ये दररोज 260 रुपये गुंतवून, तुम्हाला मॅच्युरिटीवर 54 लाख रुपये मिळू शकतात.

पॉलिसीचे फायदेजीवन लाभ पॉलिसी योजनेच्या मॅच्युरिटीपर्यंत विमाधारक हयात असल्यास त्याला/तिला रिव्हर्सिनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनससह संपूर्ण विम्याची रक्कम मिळते. विमाधारक 10, 13 आणि 16 वर्षांच्या कालावधीसाठी प्रीमियम भरतो. त्यांना 16 ते 25 वर्षांनी मॅच्युरिटीवर पैसे मिळतील. LIC जीवन लाभ पॉलिसी घेण्यासाठी किमान वय 8 वर्षे आणि कमाल वय 59 वर्षे आहे. 59 वर्षे वयाच्या व्यक्तीला फक्त 16 वर्षांच्या मॅच्युरिटीचा विमा मिळेल. त्यामुळे, मॅच्युरिटीच्या वेळी विमाधारकाचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त असू नये.

मॅच्युरिटीवर 54.50 लाखतुमचे वय 25 वर्षे असल्यास आणि 25 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसाठी तुम्ही LIC जीवन बीमा लाभ पॉलिसी खरेदी केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 54.50 लाख रुपये मिळतील. यासाठी तुम्हाला 25 वर्षात बेसिक इन्शुरन्ससाठी सुमारे 20 लाख रुपये द्यावे लागतील. म्हणजेच, तुम्हाला वार्षिक सुमारे 92,400 रुपये प्रीमियम भरावा लागेल. जर हा हप्ता रोजच्या आधारावर मोजला तर दररोज सुमारे 260 रुपये होतात. यानंतर तुम्हाला मॅच्युरिटीवर 54.50 लाख रुपये मिळतील.

टॅग्स :एलआयसीगुंतवणूक