निवृत्तीनंतरचे नियोजन तुम्ही करीत असाल तर पेन्शन योजनेसोबतच जीवन व आरोग्य विम्यातही गुंतवणूक करण्याचा सल्ला जाणकार देतात. पेन्शनमुळे रोजच्या खर्चाची पूर्तता होते, तर जीवन व आरोग्य विम्यामुळे निवृत्तीनंतरचे जगणे सुसह्य होते. त्यामुळे पेन्शन योजनेत विचारपूर्वक गुंतवणूक करायला हवी, तसेच विमा पॉलिसी घेतानाही पूर्ण पडताळणी करूनच घ्यायला हवी.
मिक्स्ड प्लॅन कसा आहे?
n अनेक विमा कंपन्या विमा आणि पेन्शन या दोन्हींचा समावेश असलेल्या संमिश्र योजना (मिक्स्ड प्लॅन) देतात.
n या योजनांत तुम्हाला मुदत विमा (टर्म इन्शुरन्स) व निश्चित कालावधीनंतर पेन्शन मिळते.
n तथापि, अशा योजनांत गुंतवणूक न करण्याचा सल्ला जाणकार देतात.
यामुळे योग्य नाहीत संमिश्र योजना
पूर्ण संरक्षण मिळत नाही
संमिश्र योजनांत विमा आणि पेन्शन एकत्र घेतल्यास संपूर्ण संरक्षण (कव्हर) मिळत नाही. जर कोणत्या व्यक्तीने अगोदरच विमा घेतला असेल आणि त्यानंतर संमिश्र योजनेत गुंतवणूक केली असेल तर त्याने केवळ खर्च वाढतो. यामुळे फायदा काहीच होत नाही.
एनपीएस ठरतेय फायद्याचे...
फिनसेफ इंडियाचे संस्थापक मिरन अग्रवाल यांनी सांगितले की, पेन्शनसाठी संमिश्र योजना चांगला परतावा देत नाहीत. त्यासाठी एनपीएस अधिक उपयुक्त आहे. एनपीएसमध्ये मोठा निधी तर उभा राहतोच, पण करात सूट मिळते.
करसवलत नाही
करतज्ज्ञ अर्चित गुप्ता यांनी सांगितले की, संमिश्र योजनांतील पेन्शनला उत्पन्न मानले जाते. त्यामुळे त्यावर कर सवलत तर दूरच उलट स्लॅबनुसार कर आकारला जातो. पेन्शन आणि विमा दोन्ही देणाऱ्या योजननांमध्ये गुंतवणूक केल्यास करसवलत मिळत नाही. हे मोठे नुकसान ठरते.
कशी असावी
निवृत्तीची रणनीती?
तज्ज्ञांच्या मते, निवृत्तीसाठी टर्म इन्शुरन्स घ्यायला हवा. त्यासोबतच रिटायरमेंट पोर्टफोलिओसुद्धा बनवायला हवा. रिटायरमेंट पोर्टफोलिओत इक्विटी म्युच्युअल फंड आणि एनपीएस यांचा समावेश असावा. म्युच्युअल फंडातून पैसे काढणे सोपे असते, तसेच परतावाही जास्त मिळतो.
एनपीएस फायद्याचे?
संमिश्र योजनांच्या तुलनेत एनपीएसमध्ये मोठा निधी उभा राहतो, तसेच करात सूटही मिळते.