केंद्र सरकारकडून (Central Government) अनेक सरकारी योजना चालवल्या जातात. आज आम्ही आपल्या एका अशा योजनेसंदर्भात माहिती देत आहोत, ज्यात सरकार आपल्याला दर महिन्याला पैसे देईल. या योजनेचे नाव आहे, पीएम वय वंदना योजना (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana). या योजनेत आपल्याला म्हातारपणी दर महिन्याला पैसे मिळतील. या सरकारी योजनेचा लाभ आपण 31 मार्च 2023 पर्यंत घेऊ शकता.
10 वर्षांनंतर परत मिळतात सर्व पैसे - ही एक प्रकारची पेन्शन योजना आहे. या योजनेत आपल्याला दर महिन्याला पैसे मिळतात. यात पती-पत्नीला दर महिन्याला 18500 रुपये मिळतात. महत्वाचे म्हणजे, या योजनेत आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि 10 वर्षांनंतर व्याजासह परत मिळतात.
कसे मिळतील 18500 रुपये? -जर एखाद्या जोडप्याने (पती-पत्नीने) या योजनेत 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली, म्हणजेच एकूण 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर यावर आपल्याला 7.40 टक्के दराने व्याज मिळेल. या रकमेवर आपल्याला वर्षाला एकूण 222000 रुपये व्याजाच्या स्वरुपात मिळतील. जर या व्याजाच्या रकमेला 12 महिन्यांनी भागले तर आपल्याला दर महिन्याला 18500 रुपये मिळतील आणि ही रक्कम पेन्शनच्या स्वरुपात आपल्या खात्यात येईल.
आपण एकटेही घेऊ शकता या योजनेचा लाभ - जर केवळ एकाच व्यक्तीला या योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर ती व्यक्ती जास्तीत जास्त 15 लाख रुपयांचीच गुंतवणूक करू शकते. यावर आपल्याला वर्षाला 111000 रुपये एवढे व्याज मिळेल. म्हणजेच आपल्या खात्यात दर महिन्याला 9250 रुपये येतील.
10 वर्षांनंत परत मिळतात पैसे - या योजनेचा मॅच्युरिटी पिरिअड 10 वर्षांचा आहे. आपण 10 वर्षांसाठी या योजनेत पैसे गुंतवू शकता. जर या योजनेत आपण 10 वर्षांसाठी पैशांची गुंतवणूक केली, तर 10 वर्षांनंतर आपण गुंतवणूक केलेले पैसे आपल्याल्या परत मिळतात.