Join us

Post Office : FD की NSC! कशात जास्त फायदा, १ लाख जमा केले तर किती मिळेल रिटर्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 1:06 PM

सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीनं फिक्स्ड डिपॉझिट अतिशय चांगल्या मानल्या जातात. पण एफडी की एनएससी कशात मिळेल जास्त रिटर्न? पाहूया.

सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीनं फिक्स्ड डिपॉझिट अतिशय चांगल्या मानल्या जातात. ज्यांना गुंतवणुकीत कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायला आवडत नाही त्यांच्यासाठी एफडी हा एक चांगला पर्याय आहे. एफडीबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ७ दिवस ते १० वर्षांपर्यंतचा कालावधी निवडू शकता. पण जर तुम्ही ५ वर्षांसाठी एफडी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा पर्याय देखील निवडू शकता. 

तुम्हाला बँक आणि पोस्ट ऑफिस या दोन्ही ठिकाणी एफडीचा पर्याय मिळेल, पण तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये एनएससीचा (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट) पर्याय मिळेल. सध्या ५ वर्षाच्या एनएससीमध्ये ७.७ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. याशिवाय, तुम्हाला टॅक्स बेनिफिटही मिळेल. 

पोस्ट ऑफिस FD वर किती परतावा 

जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केली तर तुम्हाला एका वर्षाच्या एफडीवर ६.९%, दोन वर्षांच्या एफडीवर ७.०%, तीन वर्षांच्या एफडीवर ७.१% आणि ५ वर्षांच्या एफडीवर ७.५% व्याज मिळेल. एफडी कॅल्क्युलेटरनुसार मोजल्यास, १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर, ६.९% व्याजदरानं एका वर्षात १,०७,०८१ रुपये मॅच्युरिटी मिळतील, 7% व्याजदरानं १,१४,८८८ रुपये दोन वर्षात, ७.१% व्याजदरानं तीन वर्षांत १,२३,५०८ रुपये, ५ वर्षांत ७.५ टक्के व्याजदरानं १,४४,९९५ रुपये मिळतील. एफडीवरही टॅक्स बेनिफिट्स दिले जातात. 

एनएससीवर किती रिटर्न? 

तुम्ही पोस्ट ऑफिस एफडी ऐवजी एनएससीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.७ टक्के दरानं व्याज मिळेल. एनएससीमध्ये १ लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला ७.७ टक्के व्याजदरानं ४४,९०३ रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, मॅच्युरिटी कालावधीमध्ये एकूण १,४४,९०३ रुपये मिळतील. एनएससीमध्ये 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट्सही मिळतात.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक