Join us

Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

By जयदीप दाभोळकर | Updated: April 23, 2025 16:17 IST

Post Office Scheme: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी विविध बचत योजना राबवत आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर सर्वच बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली असली तरी पोस्ट ऑफिसनं आपल्या कोणत्याही योजनेच्या व्याजदरात कपात केलेली नाही.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी विविध बचत योजना राबवत आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर सर्वच बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली असली तरी पोस्ट ऑफिसनं आपल्या कोणत्याही योजनेच्या व्याजदरात कपात केलेली नाही. पोस्ट ऑफिस एक योजना देखील चालवते ज्यामध्ये आपले पैसे थेट दुप्पट होतात. आज आपण येथे पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (KVP) योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये तुमचे पैसे ठराविक कालावधीत थेट दुप्पट होतात.

मिळतोय ७.५ टक्के व्याज दर

किसान विकास पत्र ही एक सरकारी योजना आहे, ज्यामध्ये तुमचे पैसे थेट दुप्पट होतात. आपण या योजनेत गुंतवलेले सर्व पैसे दुप्पट होतात. पोस्ट ऑफिसच्या केव्हीपी योजनेत एकरकमी गुंतवणूक केली जाते. या योजनेवर सध्या ७.५ टक्के व्याज मिळत आहे. किसान विकास पत्र योजनेत तुम्ही कमीत कमी १००० रुपये जमा करू शकता. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. म्हणजेच त्यात तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला

९ वर्ष ७ महिन्यांत योजना मॅच्युअर होते

पोस्ट ऑफिसची ही योजना ११५ महिन्यांत म्हणजेच ९ वर्ष ७ महिन्यांत मॅच्युअर होते. म्हणजेच या योजनेत जमा झालेले तुमचे पैसे ११५ महिन्यांत दुप्पट होतात. ही एक निश्चित परतावा योजना आहे आणि ती पूर्ण गॅरंटीसह निश्चित परतावा देते. या योजनेत एकच खातं तसंच संयुक्त खातंही उघडता येतं. जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ३ लोकांना खातं उघडता येतं. ही पोस्ट ऑफिसची योजना आहे आणि पोस्ट ऑफिस केंद्र सरकार चालवतं. याचा सरळ अर्थ असा होतो की या योजनेत गुंतवलेले तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक