Lokmat Money >गुंतवणूक > ₹५००० ची पोस्‍ट ऑफिस RD की SIP, ५ वर्षांत कुठे मिळेल अधिक पैसा? समजून घ्या कॅलक्युलेशन

₹५००० ची पोस्‍ट ऑफिस RD की SIP, ५ वर्षांत कुठे मिळेल अधिक पैसा? समजून घ्या कॅलक्युलेशन

पोस्ट ऑफिस आरडी आणि एसआयपी हे गुंतवणूकीचे दोन उत्तम पर्याय आहेत. परंतु जर तुम्हाला अधिक नफा हवा असेल तर नक्की कशात गुंतवणूक केली पाहिजे हे पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 03:32 PM2023-07-11T15:32:24+5:302023-07-11T15:32:40+5:30

पोस्ट ऑफिस आरडी आणि एसआयपी हे गुंतवणूकीचे दोन उत्तम पर्याय आहेत. परंतु जर तुम्हाला अधिक नफा हवा असेल तर नक्की कशात गुंतवणूक केली पाहिजे हे पाहा...

Post Office RD or SIP of rs 5000 where to get more money return in 5 years Understand the calculation investment tips and tricks | ₹५००० ची पोस्‍ट ऑफिस RD की SIP, ५ वर्षांत कुठे मिळेल अधिक पैसा? समजून घ्या कॅलक्युलेशन

₹५००० ची पोस्‍ट ऑफिस RD की SIP, ५ वर्षांत कुठे मिळेल अधिक पैसा? समजून घ्या कॅलक्युलेशन

पोस्ट ऑफिसच्या आरडीचे व्याजदर 1 जुलैपासून वाढवण्यात आले आहेत. आता या सरकारी योजनेवर 6.5 टक्के दराने व्याज मिळत आहे. यापूर्वी यावर 6.2 टक्के व्याज मिळत होतं. म्हणजेच आता पोस्ट ऑफिसच्या आरडीवर पूर्वीपेक्षा जास्त नफा मिळणार आहे. पोस्ट ऑफिस आरडी स्कीम 5 वर्षांसाठी आहे आणि यामध्ये व्याजाची हमीही मिळते.

परंतु हवं असल्यास, रिकरिंग डिपॉझिट ऐवजी तुम्ही गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडाचा पर्यायदेखील निवडू शकता. आजकाल बरेच लोक म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे पैसे गुंतवतात. यामध्ये तुम्हाला जास्त व्याज मिळेल, पण ते किती मिळेल, याची शाश्वती नाही. कारण ही स्कीम शेअर बाजाराशी लिंक्ड आहे. पोस्ट ऑफिस आरडी आणि एसआयपी दोन्हीमध्ये तुम्हाला जास्त नफा कुठे मिळेल आणि तुम्ही कुठे गुंतवणूक करू शकता हे जाणून घेऊ.

₹5000 आरडीवर किती नफा? 
समजा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा 5000 रुपयांची RD सुरू केली, तर तुम्ही एका वर्षात 60,000 आणि 5 वर्षांत एकूण 3,00,000 रुपयांची गुंतवणूक कराल. 6.5 टक्के व्याजदरानुसार, तुम्हाला या गुंतवलेल्या रकमेवर एकूण 54,957 रुपये व्याज म्हणून मिळतील. त्याच वेळी मॅच्युरिटीच्या वेळी जमा रक्कम आणि व्याजाच्या रकमेसह एकूण 3,54,957 रुपये मिळतील.

₹5000 च्या SIP वर किती नफा?
SIP बद्दल सांगायचं झालं तर तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडात दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुमची गुंतवणूक तेवढीच असेल जी तुम्ही आरडीमध्ये गुंतवणूक कराल. पण यामध्ये नफा जास्त होईल. साधारणपणे एसआयपीमध्ये सरासरी 12 टक्के परतावा मिळतो. अशात तुम्हाला 3,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1,12,432 रुपये व्याज म्हणून मिळतील आणि 5 वर्षानंतर तुम्हाला एकूण 4,12,432 रुपये मिळतील. जर तुम्ही व्याजाच्या संदर्भात तुलना केली, तर एसआयपीमध्ये मिळणारे व्याज आरडीच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे. परंतु व्याजानुसार हा नफा कमीअधिकही असू शकतो.

हेही लक्षात ठेवा
आरडीमध्ये, जर तुम्ही गुंतवणूक एकदा सुरू केली असेल, तर तुम्हाला सलग 5 वर्षे दरमहा ठराविक रकमेचा हप्ता भरावा लागेल. यापैकी, तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी रक्कम काढू शकत नाही. आवश्यक असल्यास, खाते उघडल्याच्या तारखेपासून तीन वर्षांनंतर तुम्ही ते कधीही बंद करू शकता. पण जर तुम्ही हे खाते मॅच्युरिटी कालावधीच्या एक दिवस आधी बंद केलं तर तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्यानुसार त्यावर व्याज दिले जातं.

तर एसआयपीमध्ये असा प्रकार नाही. काही कारणास्तव तुम्ही 5 वर्षे सतत गुंतवणूक करण्याच्या स्थितीत नसल्यास, तुम्ही ते कधीही बंद करू शकता आणि रक्कम काढू शकता. अशा परिस्थितीत, एसआयपीद्वारे तुम्ही बाजारात जी काही रक्कम गुंतवली असेल, त्या रकमेवर त्यावेळी जे काही व्याज असेल, त्या व्याजासह एकूण रक्कम परत केली जाईल. दुसरीकडे, जर तुम्हाला काही काळासाठी एसआयपी होल्ड करायची असेल तर तुम्ही तेही करू शकता. यानंतर, तुम्ही ते कधीही पुन्हा सुरू करू शकता. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दरम्यान हप्ता भरू शकत नसाल, तर त्यासाठी कोणताही दंड नाही.

(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Post Office RD or SIP of rs 5000 where to get more money return in 5 years Understand the calculation investment tips and tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.