Join us

Post Office Scheme: दररोज ३३३ रुपये वाचवून करा गुंतवणूक, १० वर्षांनी तयार होईल लाखोंचा फंड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 2:16 PM

कोणताही धोका न पत्करता चांगला परतावा मिळेल अशा योजनेत तुम्ही तुमचे पैसे गुंतवू इच्छित असाल तर तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवू शकता. यामध्ये तुमचा मोठा फंड तयार होऊ शकतो.

कोणताही धोका न पत्करता चांगला परतावा मिळेल अशा योजनेत तुम्ही तुमचे पैसे गुंतवू इच्छित असाल तर तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवू शकता. पोस्ट ऑफिसकडून अनेक बचत योजना चालवल्या जात आहेत, ज्या लोकांच्या पसंतीसही पडत आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही तुमचे पैसे पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवायचे असतील तर तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिस आरडी स्कीम (Post Office Recurring Deposit Scheme) मध्ये गुंतवू शकता. या योजनेत तुम्ही दररोज ३३३ रुपयांची बचत करून १७ लाखांपर्यंतचा फंड जमा करू शकता. चला जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या या योजनेबद्दल.

पोस्ट ऑफिस आरडी स्कीम (Post Office Recurring Deposit Scheme)

पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये कोणताही धोका नाही. या योजनेत तुम्ही महिन्याला फक्त १०० रुपयांची गुंतवणूक करून आपलं खातं उघडू शकता. आपण इच्छित असल्यास या योजनेत सिंगल किंवा जॉइंट दोन्ही खाती उघडू शकता. तर दुसरीकडे व्याज दराबद्दल बोलायचं झालं तर या योजनेत तुम्हाला ६.८ टक्के वार्षिक व्याज दिलं जाईल.

३३३ रुपयांची करा बचत

जर तुम्ही पोस्ट ऑफिसआरडी स्कीममध्ये दररोज ३३३ रुपयांची बचत करून गुंतवणूक केली तर तुम्ही दरमहा सुमारे १०,००० रुपये या योजनेत गुंतवाल. त्यानुसार तुम्ही वर्षभर संपूर्ण १.२० लाख रुपये या योजनेत गुंतवणार आहात. ५ वर्षांनंतर या योजनेत तुमची जमा रक्कम ५,९९,४०० रुपये होईल. ६.८ टक्के वार्षिक व्याजदरानुसार तुम्हाला १,१५,४२७ रुपये पूर्ण व्याज मिळेल. म्हणजेच ५ वर्षात तुमच्याकडे ७,१४,८२७ रुपयांचा फंड असेल. जर तुम्ही ही योजना आणखी ५ वर्षांसाठी वाढवली तर तुम्ही १० वर्षात १२ लाख रुपये जमा कराल. व्याज जोडल्यास १० वर्षांनंतर तुम्हाला १७,०८,५४६ रुपये मिळतील.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक