Join us

पोस्ट ऑफिसच्या जबरदस्त योजना; मिळेल सर्वाधिक व्याज, जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 3:41 PM

पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये करलाभदेखील मिळतो.

Post Office Scheme: आजच्या महागाईच्या काळात गुंतवणूक सर्वात महत्वाची झाली आहे. आज गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काहीजण शेअर मार्केट-म्युच्युअल फंडात, काहीजण बँकेत तर काहीजण पोस्ट ऑफिसमध्येगुंतवणूक करतात. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडाची गुंतवणूक जोखीमीची असते. आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.

पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या योजना आहेत. तुम्ही चांगल्या रिटर्न्ससाठी सुकन्या समृद्धी, महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक मासिक योजना आणि इतर योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनांचे व्याज दर प्रत्येक तिमाहीत बदलले जातात. तुम्हाला ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 8.2 टक्के आणि सुकन्या समृद्धी योजनेत 8 टक्के व्याज मिळते. या योजनांमध्ये सर्वाधिक व्याजदर उपलब्ध आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही दीर्घकालीन तसेच अल्प मुदतीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये कर लाभ मिळत नाही, तर अनेक पोस्ट ऑफिस योजनांमध्ये, आयकर कायदा 1961 च्या 80C अंतर्गत कर लाभ दिला जातो. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला या योजनेचा कालावधी काय आणि त्यात कर लाभ मिळतो की, नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. 

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूकव्यवसायपैसा