Join us

दरमहा ५००० गुंतवा, १० वर्षांत ८ लाख कमवा; कर्जही मिळेल, कुठे अन् कशी कराल गुंतवणूक? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 8:01 AM

एवढेच नव्हे, तर गुंतवणूक सुरू झाल्यानंतर वर्षभराने तुम्हाला ५० टक्क्यांपर्यंत कर्जही मिळू शकते.

लोकमत न्यूज नेटवर्क : नियमित बचत आणि गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा हवा असेल, तर पोस्ट ऑफिसने तुमच्यासाठी चांगला पर्याय आणला आहे. रिकरिंग डिपॉझिटच्या (आरडी) माध्यमातून तुमची गुंतवणूक सुरक्षित तर राहतेच, शिवाय त्यातून उत्तम परतावादेखील मिळतो. एवढेच नव्हे, तर गुंतवणूक सुरू झाल्यानंतर वर्षभराने तुम्हाला ५० टक्क्यांपर्यंत कर्जही मिळू शकते.

व्याजदरात वाढ

केंद्र सरकारने नुकतीच पोस्ट ऑफिसमधील आर.डी. योजनेतील गुंतवणुकीवरील व्याजदरात वाढ केली आहे. आतापर्यंत ६.२ टक्क्यांवर असलेले आरडीवरील व्याजदर या तिमाहीसाठी ६.५ टक्के केले आहे. त्यामुळे ही योजना अधिक फायदेशीर ठरते.

कर्जाचीही सुविधा

पोस्ट ऑफिसमधील आरडी योजनेत गुंतवणूक सुरू केल्यानंतर वर्षभराने तुम्हाला एकूण गुंतवणुकीच्या ५० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. लाखो गुंतवणूकदांरासाठी पोस्ट खात्यातील गुंतवणूक ही सुरक्षित वाटते. यातील गुंतवणुकीवर करसवलतही मिळत असल्याने मोठा फायदा मिळतो.

कशी कराल गुंतवणूक?

- पोस्ट ऑफिसमधील बचत ठेव योजनेत तुम्ही १ वर्ष, २ वर्षे तसेच अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता.- या योजनेत १८ वर्षांवरील कोणताही व्यक्ती गुंतवणूक करू शकतो.- १८ वर्षांखालील मुला-मुलींना त्यांच्या पालकांसह जॉइंट अकाऊंटद्वारे या योजनेत सहभागी होता येते.- दरमहा किमान १०० रुपयांपासून तुम्ही १० वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता.- केंद्र सरकारकडून अशा योजनेतील गुंतवणुकीवरील व्याजदरांचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जातो. त्यामुळे व्याजदरातील चढ-उतारानुसार तुमचा परतावा ठरतो.- सध्याच्या ६.५ टक्के व्याजदरानुसार तुम्ही दरमहा ५ हजार रुपये गुंतवल्यास दहा वर्षांनी तुम्हाला ८ लाख मिळतील.- विशेष म्हणजे या योजनेतील गुंतवणूक तुम्हाला ३ वर्षांनंतर बंद करता येते.

पोस्टातील अन्य योजना

१. राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना२. ज्येष्ठ नागरिक बचत योजना३. पब्लिक प्रोव्हिडंट फंड४. सुकन्या समृद्धी योजना५. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र६. किसान विकास पत्र७. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

 

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक