Lokmat Money >गुंतवणूक > Post Office Scheme : पोस्ट ऑफिस योजना; फक्त व्याजातून कमवा 2 लाख रुपये, जाणून घ्या गणित...

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस योजना; फक्त व्याजातून कमवा 2 लाख रुपये, जाणून घ्या गणित...

तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी चांगला पर्याय आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 02:59 PM2023-04-14T14:59:50+5:302023-04-14T15:00:15+5:30

तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी चांगला पर्याय आहेत.

Post Office SCSS Scheme : Earn Rs 2 Lakh from Interest Only, Know the Maths | Post Office Scheme : पोस्ट ऑफिस योजना; फक्त व्याजातून कमवा 2 लाख रुपये, जाणून घ्या गणित...

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस योजना; फक्त व्याजातून कमवा 2 लाख रुपये, जाणून घ्या गणित...

Post Office SCSS: तुम्ही कष्टाने कमावलेले पैशांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल आणि तुम्हाला खात्रीशीर परतावा हवा असेल, तर पोस्ट ऑफिस योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिस तुम्हाला अनेक योजना ऑफर करत आहे. विशेषत: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना आहेत. यात सुरक्षित गुंतवणुकीसह खात्रीशीर परतावादेखील मिळतो. 

अशीच एक योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS). या योजनेत 8.2% वार्षिक व्याज दिले जात आहे. SCSS खास अशा लोकांसाठी आहे, ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. याशिवाय ज्यांनी व्ही.आर.एस. घेतली आहे. सध्या या योजनेवर 8.2% व्याज मिळत आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एकरकमी पैसे गुंतवणूक फक्त व्याजाद्वारे 2 लाख रुपये कमवू शकता. 

पोस्ट ऑफिस SCSS चे गणित
योजनेत जमा केलेली एकरकमी रक्कम: रु 5 लाख
ठेव कालावधी: 5 वर्षे
व्याज दर : 8.2%
मॅच्योरिटी रक्कम: रु 7,05,000
मिळालेले व्याज: रु 2,05,000

SCSS चे अनेक फायदे
ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही भारत सरकारद्वारे समर्थित लहान बचत योजना आहे. ही विश्वसनीय आणि सुरक्षित पर्यायांपैकी एक मानली जाते.
आयकर कायदा कलम 80C अंतर्गत या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदार दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सूट मिळवू शकतात.
8.2% व्याजदर दरवर्षी उपलब्ध असतो, जो जोखीम घटकांच्या दृष्टीने इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा खूपच चांगला आहे. पोस्ट ऑफिस योजनेचे हे खाते देशातील कोणत्याही शाखेत हस्तांतरित केले जाऊ शकते. योजनेअंतर्गत दर 3 महिन्यांनी व्याज दिले जाते. प्रत्येक एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीच्या पहिल्या दिवशी तुमच्या खात्यात व्याज जमा केले जाते.

SCSS साठी खाते कसे उघडायचे?
कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा सरकारी/खासगी बँकेत यासाठी खाते उघडण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. यासोबतच हा फॉर्म 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, ओळखीचा पुरावा आणि इतर KYC कागदपत्रांच्या प्रतीसह सादर करावा लागेल. बँकेत खाते उघडण्याचा फायदा असा आहे की जमा केलेले व्याज थेट बँक शाखेतील ठेवीदाराच्या बचत बँक खात्यात जमा केले जाऊ शकते. 

Web Title: Post Office SCSS Scheme : Earn Rs 2 Lakh from Interest Only, Know the Maths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.