आता लोक गुंतवणुकीबाबत खूप जागरूक होत आहेत. मुलांचा विचार केला तर त्यांच्या जन्मापासूनच पालक नियोजन करण्यास सुरुवात करतात. उच्च शिक्षणापासून लग्नापर्यंत सर्व गोष्टींसाठी निधीची व्यवस्था कशी करावी याबद्दल पालकांना चिंता असते आणि ते गुंतवणुकीसाठी चांगल्या योजनांच्याही शोधात असतात. आजकाल मुलांसाठी एफडी, पीपीएफ, सुकन्या समृद्धी इत्यादी अनेक योजना आहेत, ज्यामध्ये हमखास परतावा मिळतो. पण पोस्ट ऑफिसची एक योजना आहे जी मुलांना जीवन विमा कवच देते, परंतु त्याबद्दल बऱ्याच लोकांना कल्पना नाही.आम्ही तुम्हाला सांगत आहोत पोस्ट ऑफिसच्या बाल जीवन विमा (Bal Jeevan Bima Scheme) योजनेबद्दल. ही योजना खास मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. ही योजना पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत चालविली जाते आणि या योजनेअंतर्गत, मॅच्युरिटीवर ३ लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम उपलब्ध आहे. जाणून घेऊया या योजनेबद्दल अधिक माहिती.कोणासाठी घेऊ शकता?पोस्ट ऑफिस चाइल्ड लाइफ इन्शुरन्स मुलांचे पालक खरेदी करू शकतात. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दोन मुलांना मिळू शकतो. हे ५ वर्षे ते २० वर्षे वयोगटातील मुलांसाठी खरेदी केले जाऊ शकते. ज्या पालकांना त्यांच्या मुलांसाठी ही विमा योजना खरेदी करायची आहे, त्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावं.किती सम एश्योर्ड?पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत, ३ लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम उपलब्ध आहे. तर जर तुम्ही ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI) अंतर्गत पॉलिसी घेतली असेल, तर पॉलिसीधारकाला १ लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम मिळेल. ही पॉलिसी आकर्षक बनवण्यासाठी त्यात एन्डॉमेंट पॉलिसीप्रमाणे बोनसचा समावेश करण्यात आला आहे. जर तुम्ही ही पॉलिसी ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत घेतली असेल, तर १००० रुपयांच्या विमा रकमेवर तुम्हाला दरवर्षी ४८ रुपये बोनस दिला जातो. तर पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत दरवर्षी ५२ रुपये बोनस दिला जातो.५ वर्षांनंतर पेडअप पॉलिसी बनते५ वर्षे नियमित प्रीमियम भरल्यानंतर ही पॉलिसी पेड अप पॉलिसी बनते. या योजनेत, प्रीमियम भरण्याची जबाबदारी पालकांची आहे, परंतु पॉलिसीच्या मुदतपूर्तीपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्यास, मुलांचा प्रीमियम माफ केला जातो. बालकाचा मृत्यू झाल्यास, विमा रक्कम बोनससह नॉमिनीला दिली जाते.लोनची सुविधा नाहीतुम्ही या योजनेत मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक गुंतवणूक करू शकता. इतर सर्व पॉलिसींप्रमाणे या योजनेवर कर्जाची सुविधा उपलब्ध नाही. मुलांसाठी ही पॉलिसी घेताना वैद्यकीय तपासणीची गरज नाही. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या योजनेत पॉलिसी सरेंडर करण्याची कोणतीही तरतूद नाही.
Post Office ची विशेष स्कीम; मुलांसाठी लाइफ इन्शुरन्स, ३ लाखांचा सम एश्योर्ड, आणखी कोणते बेनिफिट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 2:09 PM