Join us

पोस्ट ऑफिसची दमदार योजना; ₹3,00,000 गुंतवा अन् फक्त व्याजातून 1,34,984 रुपये कमवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 8:26 PM

Post Office Time Deposit : तुम्ही सुरक्षित गुंतवणूकीच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्या कामाची आहे.

Post Office FD Scheme : तुम्ही सुरक्षित गुंतवणूक आणि दमदार परतावा असलेल्या योजनेच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत, ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (Post Office Time Deposit) ही अशाय योजनांपैकी एक आहे, ज्यात चांगला परतावा मिळतो. या योजनेलाच लोक पोस्ट ऑफिस FDदेखील म्हणतात. 

तुम्हाला बँकांमध्येही एफडीचे पर्याय मिळतील, पण तुम्ही 5 वर्षांसाठी एफडी घेणार असाल, तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये चांगले व्याज मिळेल. सध्या पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या एफडीवर 7.5% दराने व्याज मिळते. याशिवाय तुम्हाला 5 वर्षांच्या एफडीमध्ये आयकर कायदा 80C अंतर्गत कर लाभ देखील मिळतो. पोस्ट ऑफिसमध्ये ₹ 1,00,000, ₹ 2,00,000 आणि ₹ 3,00,000 ची FD केल्यास व्याजातून किती पैसे मिळतील, जाणून घ्या...

₹3,00,000 ची FD केल्यावरतुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीममध्ये ₹ 3,00,000 ची गुंतवणूक केल्यास तुम्हाला फक्त 7.5 टक्के दराने ₹ 1,34,984 व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण ₹ 4,34,984 मिळतील.

₹ 2,00,000 ची FD केल्यावरतुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीममध्ये ₹ 2,00,000 ची गुंतवणूक केली, तर तुम्हाला ₹ 89,990 व्याज 7.5 टक्के व्याज दराने मिळेल. म्हणजेच तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण ₹ 2,89,990 मिळतील.

₹ 1,00,000 ची FD केल्यावरतुम्ही या योजनेत ₹1,00,000 रुपये गुंतवल्यास 7.5 टक्के व्याजदराने तुम्हाला ₹ 44,995 व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण ₹ 1,44,995 मिळतील.

 

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूकव्यवसायबँकिंग क्षेत्र