Join us

ज्येष्ठ नागरिकांसाठी Post Office ची खास योजना; फक्त व्याजातून मिळतील 12,30,000 रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 3:15 PM

ही योजना पोस्ट ऑफिस अंतर्गत असल्यामुळे 100% सुरक्षित आहे.

Post Office Scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांना मिळणारे निवृत्ती वेतन सर्वात मोठा आधार असतो. आयुष्यभर कष्ट करुन जमवलेल्या या पैशांपबाबत ज्येष्ठ नागरिक कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही. यामुळेच ते आपले पैसे कुठेही न गुंतवता सुरक्षित योजनांमध्ये गुंतवण्याचा विचार करतात. बहुतांश ज्येष्ठ नागरिक बँक एफडीला प्राधान्य देतात.

परंतु जर तुम्ही तुमची बचत बँक एफडी ऐवजी पोस्ट ऑफिस सीनियर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम (SCSS) मध्ये फक्त 5 वर्षांसाठी जमा केली, तर तुमचे पैसे देखील 100% सुरक्षित राहतील आणि तुम्हाला त्यावर चांगले व्याजदर मिळू शकतील. सध्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 8.2 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. 

जास्तीत जास्त किती रक्कम जमा केली जाऊ शकते?कोणताही ज्येष्ठ नागरिक SCSS मध्ये जास्तीत जास्त 30,00,000 रुपये गुंतवू शकतो, तर किमान गुंतवणुकीची मर्यादा 1000 रुपये आहे. या योजनेत जमा केलेल्या रकमेवर तिमाही आधारावर व्याज दिले जाते. योजना 5 वर्षांनी परिपक्व होते. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. व्हीआरएस घेणारे सरकारी कर्मचारी आणि संरक्षणातून निवृत्त होणाऱ्या लोकांना काही अटींसह वयात सवलत दिली जाते.

तुम्ही फक्त व्याजातून 12,30,000 रुपये कमवू शकतातुम्हाला हवे असल्यास तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतून केवळ व्याजातून जास्तीत जास्त 12,30,000 रुपये कमवू शकता. परंतु यासाठी तुम्हाला SCSS खात्यात 30,00,000 रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही या योजनेत 30,00,000 रुपये जमा केले तर तुम्हाला त्यावर 5 वर्षात 8.2 टक्के व्याज मिळेल. SCSS कॅल्क्युलेटरनुसार, हे व्याज रु. 12,30,000 असेल. म्हणजे 5 वर्षानंतर तुम्हाला 42,30,000 रुपये मॅच्युरिटी रक्कम मिळेल. कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ SCSS मध्ये उपलब्ध आहे.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूकव्यवसाय