Join us  

रिटायमेंटनंतर पोस्टाची 'ही' स्कीम बनेल तुमचा 'आधार', महिन्याला ₹९,२५० ची कमाई; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 10:57 AM

पोस्ट ऑफिसच्या अनेक स्कीम्स आजही लोकप्रिय आहेत. साधारणपणे पोस्ट ऑफिसच्या योजना सुरक्षित मानल्या जातात.

पोस्ट ऑफिसच्या अनेक स्कीम्स आजही लोकप्रिय आहेत. साधारणपणे पोस्ट ऑफिसच्या योजना सुरक्षित मानल्या जातात. तुम्ही येथे अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करून खात्रीशीर परतावा मिळवू शकता. त्याचप्रमाणे, तुम्ही खात्रीपूर्वक उत्पन्नासाठी पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. त्याला एमआयएस (MIS) असंही म्हणतात.मंथली इन्कम स्कीमया स्कीममध्ये दरमहा उत्पन्नाची हमी मिळते. यामध्ये केवळ एकरकमी गुंतवणूक करता येते. २०२३ च्या अर्थसंकल्पातच सरकारनं याची मर्यादा दुप्पट केलीये. पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीमच्या (Post office Monthly income scheme) मदतीनं तुम्ही कमाई करू शकता. या योजनेत एकल आणि संयुक्त (३ व्यक्तींपर्यंत) दोन्ही खाती उघडता येतात. याचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षे आहे. सध्या १ एप्रिल २०२३ पासून एमआयएसवर ७.४ टक्के व्याज दिलं जात आहे.महिन्याला मिळेल इतकं इन्कमपोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये मिळणारं व्याज १२ महिन्यांत विभागलं जातं आणि ती रक्कम दरमहा मिळते. जर तुम्ही मासिक पैसे काढले नाहीत तर ते तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात राहतील. किती करू शकता गुंतवणूक?लिमिटबद्दल सांगायचं झाल्यास, एक खातं उघडल्यानंतर, तुम्ही जास्तीत जास्त ९ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता, तर संयुक्त खातं उघडल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त १५ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. संयुक्त खातं तीन लोक एकत्र उघडू शकतात. मंथली सेव्हिंग स्कीमअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असणं आवश्यक आहे. १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.मॅच्युरिटी पीरिअडया स्कीमचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षे आहे. एकूण मूळ रक्कम ५ वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर काढता येते. यामध्ये आणखी ५-५ वर्षांनी कालावधी वाढवता येतो. दर ५ वर्षांनी, मूळ रक्कम काढण्याचा किंवा योजनेला मुदतवाढ देण्याचा पर्याय असेल.मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढण्यासाठी १ ते ३ वर्षांपर्यंत जुनं अकाऊंट असल्यास जमा रकमेतून २ टक्के रक्कम कापून दिली जाते. तर ३ वर्षांपेक्षा जुनं अकाऊंट असल्यास १ टक्के रक्कम कापून दिली जाते.

टॅग्स :गुंतवणूकपोस्ट ऑफिस