Lokmat Money >गुंतवणूक > PPF Interest Rates : कर्मचारी वर्गाला सरकार मोठे गिफ्ट देणार? PPFचे व्याजदरवाढीचे संकेत

PPF Interest Rates : कर्मचारी वर्गाला सरकार मोठे गिफ्ट देणार? PPFचे व्याजदरवाढीचे संकेत

सरकारनं गेल्या दोन तिमाहीत लहान बचत योजनांच्या १२ योजनांवरील व्याजदरात वाढ केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 10:29 AM2023-06-11T10:29:05+5:302023-06-11T10:29:30+5:30

सरकारनं गेल्या दोन तिमाहीत लहान बचत योजनांच्या १२ योजनांवरील व्याजदरात वाढ केली होती.

PPF Interest Rates Will the government give a big gift to the employees PPF interest rate may hike know details | PPF Interest Rates : कर्मचारी वर्गाला सरकार मोठे गिफ्ट देणार? PPFचे व्याजदरवाढीचे संकेत

PPF Interest Rates : कर्मचारी वर्गाला सरकार मोठे गिफ्ट देणार? PPFचे व्याजदरवाढीचे संकेत

PPF Interest Rates : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या गुंतवणूकदारांना सरकार व्याजदराची भेट देऊ शकते. सरकारनं गेल्या दोन तिमाहीत लहान बचत योजनांच्या १२ योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे, परंतु पीपीएफगुंतवणूकदारांसाठीचे व्याजदर दोन्ही वेळा कायम ठेवण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत सरकार जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी पीपीएफवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा करू शकते.

अर्थ मंत्रालय लघु बचत योजना आणि पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदरांची दर तीन महिन्यांनी समीक्षा करून व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेते. अर्थ मंत्रालयानं शेवटची घोषणा ३१ मार्च २०२३ रोजी व्याजदरात वाढ केली होती आणि लहान बचत योजनांच्या १२ बचत योजनांपैकी १० बचत योजनांचे व्याजदर वाढवले होते. परंतु, पीपीएफचे व्याजदर मात्र बदलले नाहीत. सध्या पीपीएफचा व्याजदर ७.१ टक्के आहे.

३० जूनला बैठक
गुंतवणूकदारांना सर्वाधिक आकर्षित करणाऱ्या पीपीएफ बचत योजनेवरील व्याजदरात अर्थ मंत्रालयानं गेल्या दोन तिमाहीत वाढ केलेली नाही. सुरू असलेल्या जून तिमाहीसाठी व्याजदरात कोणतीही वाढ झालेली नाही. आता जुलै-सप्टेंबर या तिमाहीसाठी अर्थ मंत्रालयाची ३० जून रोजी आढावा बैठक होणार आहे, ज्यामध्ये व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. अर्थ मंत्रालय पीपीएफवरील व्याजदर ८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

१.५ लाखांवर किती मिळतं व्याज
पीपीएफ योजना ही अधिक व्याज देणारी सर्वात लोकप्रिय सरकारी योजना आहे. १५ वर्षांच्या गुंतवणुकीच्या मर्यादेसह या योजनेत, वर्षाला जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. या रकमेवर सध्या लागू असलेला व्याजदर ७.१ टक्के आहे. अशाप्रकारे, १५ वर्षांसाठी दरवर्षी १.५ रुपये जमा केले जातात, ज्यावर वार्षिक व्याज १०,६५० रुपये मिळतं.

Web Title: PPF Interest Rates Will the government give a big gift to the employees PPF interest rate may hike know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.