Lokmat Money >गुंतवणूक > PPF, NPS आणि सुकन्या समृद्धीच्या ग्राहकांनी २ दिवसात 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा...

PPF, NPS आणि सुकन्या समृद्धीच्या ग्राहकांनी २ दिवसात 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा...

PPF, NPS and SSY Scheme Investor: आता हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या दोन दिवसांत तुम्हाला काही महत्त्वाची कामं पूर्ण करावी लागतील, अन्यथा तुमची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 10:02 AM2024-03-30T10:02:06+5:302024-03-30T10:02:31+5:30

PPF, NPS and SSY Scheme Investor: आता हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या दोन दिवसांत तुम्हाला काही महत्त्वाची कामं पूर्ण करावी लागतील, अन्यथा तुमची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

PPF NPS and Sukanya Samriddhi customers complete important task within 2 days else will face problems tax | PPF, NPS आणि सुकन्या समृद्धीच्या ग्राहकांनी २ दिवसात 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा...

PPF, NPS आणि सुकन्या समृद्धीच्या ग्राहकांनी २ दिवसात 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा...

PPF, NPS and SSY Scheme Investor: आता हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या दोन दिवसांत तुम्हाला काही महत्त्वाची कामं पूर्ण करावी लागतील, अन्यथा तुमची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सुकन्या समृद्धी योजना (SSY), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मधील गुंतवणूकदारांना त्यांची खाती सक्रिय ठेवण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात किमान रक्कम जमा करावी लागते. ही किमान वार्षिक रक्कम जमा न केल्यास झाल्यास खातं गोठवलं जाऊ शकतं आणि दंडही ठोठावला जाऊ शकतो.
 

चालू आर्थिक वर्षासाठी पीपीएफ, सुकन्या समृद्धी आणि एनपीएस खात्यांमध्ये किमान रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ आहे. त्याचा संबंध कर आकारणीशीही आहे. वास्तविक, सरकारनं नवीन कर प्रणाली अधिक आकर्षक केली आहे. या अंतर्गत १ एप्रिल २०२३ पासून आयकर स्लॅबमध्ये बदल करून बेसिक एक्झम्पशन लिमिट २.५ लाख रुपयांवरून ३ लाख रुपये करण्यात आली आहे. नवीन कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शनचाही समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारे, ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणतेही कर दायित्व नाही.
 

... तर कर सूटीचा लाभ मिळणार नाही
 

जे लोक आधीपासूनच पीपीएफ, सुकन्या समृद्धी आणि एनपीएस सारख्या कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत त्यांनी कदाचित नवीन कर प्रणालीकडे स्विच केलं असेल किंवा ते करण्याची योजना आखली असेल. तसं असल्यास, त्यांना या योजनांमधील गुंतवणुकीवर कर लाभ मिळू शकणार नाहीत.
 

अशा लोकांना असंही वाटू शकतं की त्यांना २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची किंवा डिपॉझिट करण्याची गरज नाही. दरम्यान, या खात्यांमध्ये किमान रक्कम जमा न केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. दंड टाळण्यासाठी, प्रत्येक योजनेसाठी किमान किती रक्कम जमा करावी लागेल हे जाणून घेऊ.
 

सुकन्या समृद्धी योजना
 

SSY योजनेसाठी प्रत्येक आर्थिक वर्षात किमान २५० रुपये जमा करण्याची गरज आहे. किमान रक्कम जमा न केल्यास, खातं डीफॉल्ट खातं मानलं जातं. खातं पुन्हा सुरू करण्यासाठी डीफॉल्टच्या प्रत्येक वर्षासाठी ५० रुपये डीफॉल्ट शुल्क भरावं लागेल. हे प्रत्येक वर्षाच्या डिफॉल्टसाठी किमान २५० रुपयांच्या योगदानासह भरावं लागेल.
 

पीपीएफ
 

PPF नियम २०१९ नुसार, प्रत्येक आर्थिक वर्षात पीपीएफ खात्यात किमान ५०० रुपये जमा करणं आवश्यक आहे. किमान रक्कम जमा न केल्यास, पीपीएफ खातं निष्क्रिय होतं. खातं पुन्हा सुरू करण्यासाठी, प्रत्येक वर्षासाठी ५० रुपये डीफॉल्ट फी वार्षिक किमान रक्कम ५०० रुपयांसह भरावी लागेल.
 

एनपीएसमध्ये किती योगदान
 

गुंतवणूकदारांना प्रत्येक आर्थिक वर्षात त्यांच्या एनपीएस खात्यात किमान १,००० रुपये जमा करावे लागतात. ही किमान रक्कम जमा न केल्यास खातं गोठवलं जातं. फ्रीझ खातं सक्रिय करण्यासाठी एकरकमी किमान ५०० रुपये योगदान दिलं जाऊ शकते. खातं सक्रिय ठेवण्यासाठी प्रति आर्थिक वर्षात किमान १ हजार रुपये योगदान आवश्यक आहे.

Web Title: PPF NPS and Sukanya Samriddhi customers complete important task within 2 days else will face problems tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.