Lokmat Money >गुंतवणूक > PPF की FD कोणत्या स्कीममध्ये होणार जबरदस्त फायदा, व्याजदर किती? पाहा संपूर्ण डिटेल्स 

PPF की FD कोणत्या स्कीममध्ये होणार जबरदस्त फायदा, व्याजदर किती? पाहा संपूर्ण डिटेल्स 

साधारणपणे, बाजारात गुंतवणूकीच्या योजना आहेत, परंतु चांगली स्कीम निवडणं कठीण काम असू शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 04:47 PM2023-09-18T16:47:09+5:302023-09-18T16:47:36+5:30

साधारणपणे, बाजारात गुंतवणूकीच्या योजना आहेत, परंतु चांगली स्कीम निवडणं कठीण काम असू शकतं.

PPF or FD in which scheme will be huge benefit See full details interest rates terms | PPF की FD कोणत्या स्कीममध्ये होणार जबरदस्त फायदा, व्याजदर किती? पाहा संपूर्ण डिटेल्स 

PPF की FD कोणत्या स्कीममध्ये होणार जबरदस्त फायदा, व्याजदर किती? पाहा संपूर्ण डिटेल्स 

PPF Vs FD: साधारणपणे, बाजारात गुंतवणूकीच्या योजना आहेत, परंतु चांगली स्कीम निवडणं कठीण काम असू शकतं. म्हणूनच आजही लोक पीपीएफ किंवा एफडी सारख्या सरकारी योजनांवर अवलंबून असतात. या दोन्ही योजना बाजारातील जोखमीपासून दूर आहेत. तुम्हालाही सरकारच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना किंवा फिक्स्ड डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी कोणता पर्याय चांगला आहे ते पाहूया.

पीपीएफ
या योजनेत तुम्ही १५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. १५ वर्षांनंतर, तुम्ही ५ वर्षांसाठी 3 वेळा ब्लॉकमध्ये ही स्कीम वाढवू शकता. यामध्ये तुम्ही किमान ५०० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये गुंतवू शकता. सध्या या योजनेत जमा केलेल्या रकमेवर ७.१ टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेत पीपीएफ प्री-मॅच्युअर क्लोजर काही अटींसह करता येते. यामध्ये तुमचं इन्कम आणि मॅच्युरिटी दोन्ही रक्कम आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत करमुक्त आहे.

एफडी
बँकांची एफडी (FD) हा विश्वासार्ह आणि सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. तुम्हाला ७ दिवस ते १० वर्षांसाठी एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा मिळते. बाजारातील परिस्थिती कशीही असली तरीही, तुम्हाला तुमच्या ठेवींवर निश्चित व्याज मिळते. फिक्स्ड डिपॉझिटवर बचत खात्यांपेक्षा जास्त व्याज मिळतं. स्टेट बँक ऑफ इंडिया सामान्य लोकांना ३ टक्के ते ७.१० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ३.५० टक्के ते ७.६० टक्के व्याज देत आहे.

कोणतं ठरेल फायदेशीर
गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर हे दोन्ही पर्याय चांगले आहेत. परंतु व्याजदरावर नजर टाकली तर सध्या पीपीए स्कीम एफडी पेक्षा जास्त व्याज देत आहे. तुम्ही टॅक्स बेनिफिट्ससह लाँग टर्म रिटारमेंट सेव्हिंगला प्राधान्य देत असाल तर पीपीएफ तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. पण जर तुम्हाला फ्लेक्सिबिलिटीसह हमखास परतावा मिळवायचा असेल तर एफडी हा एक चांगला पर्याय आहे. पीपीएफ ही एक सरकारी योजना आहे, तिचा लॉकिंग कालावधी १५ वर्षांचा आहे, जर तुम्हाला मुदतपूर्तीनंतर पैसे काढायचे असतील तर ही परवानगी ५ वर्षानंतरच दिली जाते.

Web Title: PPF or FD in which scheme will be huge benefit See full details interest rates terms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.