तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात (PPF) गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्यावर चांगलं व्याज तर मिळतंच पण इतर अनेक फायदेही मिळतात. यापैकी एक सुविधा म्हणजे लोनची सुविधा. पीपीएफवरील कर्ज वैयक्तिक कर्जापेक्षा खूपच स्वस्त आहे. म्हणजेच, जर तुम्हाला अडचणीच्या वेळी अचानक पैशांची गरज भासली तर तुम्हाला तुमची कोणतीही पॉलिसी तोडण्याची गरज नाही, तुम्ही पीपीएफ कर्ज घेऊन तुमची गरज सहज पूर्ण करू शकता. पीपीएफच्या कर्जाबाबत काही नियम आहेत, जे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पाहूया याच्याशी निगडीत काही महत्त्वाच्या बाबी.वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत स्वस्तपीपीएफ कर्जाची चांगली गोष्ट म्हणजे ते अतिशय वाजवी दरात उपलब्ध आहे आणि यासाठी तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. याचं कारण म्हणजे हे कर्ज तुम्हाला तुमच्या पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेच्या आधारे दिलं जातं. कर्जाच्या व्याजदरांबद्दल बोलायचं झाल्यास, नियमांनुसार, पीपीएफ खात्यावर मिळणारं व्याज हे पीपीएफ खात्यावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा एक टक्क्यानं अधिक आहे. म्हणजेच, सध्या तुम्हाला तुमच्या पीपीएफ खात्यावर ७.१ टक्के दरानं व्याज मिळत असेल, तर कर्जावरील व्याज ८.१ टक्के असेल. तर वैयक्तिक कर्जाचा व्याजदर १०.५० टक्के ते १७ किंवा १८ टक्क्यांपर्यंत असू शकतो.३ वर्षांत फेडावं लागतं लोनपीपीएफ कर्ज घेतल्यानंतर, तुम्हाला ते परत करण्यासाठी चांगला वेळ दिला जातो. तुम्ही ही कर्जाची रक्कम तीन वर्षांत म्हणजे ३६ हप्त्यांमध्ये परत करू शकता. तुम्हाला किती हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड करायची आहे हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. सर्वप्रथम तुम्हाला कर्जाची मूळ रक्कम भरावी लागेल. नंतर, पेमेंट कालावधीनुसार व्याज मोजलं जाते. याशिवाय, जर तुम्हाला मध्ये एकरकमी रक्कम मिळाली, तर तुम्ही ती रक्कम एकाच वेळी भरून परत करू शकता. परंतु जर तुम्ही ३६ महिन्यांच्या आत कर्जाची परतफेड करू शकत नसाल, तर तुम्हाला पीपीएफवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा १ टक्का अधिक नाही, तर ६ टक्के अधिक व्याजदरानं कर्ज फेडावं लागेल.काय आहेत अटी?
- पीपीएफ खाते किमान एक आर्थिक वर्ष जुनं असलं पाहिजे, तरच तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता.
- पीपीएफ खात्याची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यावर कर्जाची सुविधा उपलब्ध नसते. कारण त्यानंतर तुम्ही पार्शली रक्कम काढू शकता.
- पीपीएफ खात्यात उपलब्ध असलेल्या रकमेपैकी केवळ २५ टक्के रक्कम तुम्ही कर्ज म्हणून घेऊ शकता.
- तुम्ही पीपीएफ खात्यावर एकदाच कर्ज घेऊ शकता. तुम्ही आधीच्या कर्जाची परतफेड केली असली तरीही तुम्हाला या खात्यावर पुन्हा कर्जाची सुविधा मिळत नाही.
कसा कराल अर्जयासाठी तुम्हाला पीपीएफ खातं उघडलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन फॉर्म भरुन कर्जासाठी अर्ज करावा लागेल. एसबीआयमध्ये यासाठी फॉर्म डी वापरला जातो. यासोबतच कर्जाची रक्कम आणि परतफेडीचा कालावधी अर्जात लिहावा लागेल. जर तुम्ही याआधी कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला ते देखील नमूद करावं लागेल. यानंतर पीपीएफ पासबुक जमा करावे लागेल. संपूर्ण प्रक्रियेनंतर साधारण आठवडाभरात कर्ज मंजूर होतं.