आजकाल मोठ्या प्रमाणात लोक खाजगी नोकरीत आहेत. खाजगी नोकरी पूर्णपणे सुरक्षित मानली जाऊ शकत नाही. यात कधी काय होऊ शकतं हे सांगताही येत नाही. कधी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ देतील याचीही खात्री नाही. जर असं काही झालं, तर नोकरी गमावल्यानंतर, दुसरी शोधण्यासाठी थोडा वेळ लागतो. या काळात पैशाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आपण काही पूर्वतयारी करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून कठीण प्रसंग आला तरी आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही आणि महत्त्वाचं काम थांबणार नाही. आपण आज अशी ५ कामं जाणून घेणार आहोत, जी प्रत्येकांनं करणं आवश्यक आहे.इमर्जन्सी फंडभविष्यात उद्भवू शकणारे कोणतेही अनपेक्षित खर्च पूर्ण करण्यासाठी तुम्ही आपत्कालीन निधी तयार ठेवला आहे का? सामान्यतः लोक पर्सनल फायनान्सच्या सर्व नियमांचे पालन करतात, परंतु हे विसरतात. अनेकदा लोक आपत्कालीन निधीशिवाय गुंतवणूक करत राहतात आणि जेव्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा ते गुंतवणूक केलेली रक्कम काढून घेतात. असं करणं योग्य नाही. भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही अनपेक्षित खर्चासाठी पुरेसा निधी स्वतंत्रपणे ठेवला पाहिजे.आरोग्य विमाअचानक आलेल्या वैद्यकीय बिलांचा तुमच्या खिशावर भार पडू शकतो. विमा संरक्षण मिळणं ही काळाची गरज आहे. विम्याचे हप्ते म्हणजे आरोग्य विम्याचे हप्ते थांबवू नका. जर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला विम्याचं संरक्षण दिलं नसेल, तर कोणत्याही आरोग्याच्या समस्येमुळे तुमच्या बचत आणि गुंतवणुकीत मोठं नुकसान होऊ शकतं.
इन्शुरन्सअपघात किंवा कोणतीही अनपेक्षित परिस्थिती उद्भवल्यास नुकसान झाल्यास विमा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक भरपाई देतो. तुमच्या विमा गरजांचे मूल्यमापन करा आणि त्यानुसार विमा खरेदी करा. तुमच्यासाठी टर्म इन्शुरन्स घेणं चांगलं ठरेल जो विम्याचा सर्वात स्वस्त पर्याय आहे.
कर्ज टाळासाधारणपणे, तरुण आपली जीवनशैली सुधारण्याच्या आणि बदलण्याच्या मनःस्थितीत असतात. त्यामुळेच ते त्यांच्या परतफेडीच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेतात. हे टाळलं पाहिजे. जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर सर्वात आधी ते फेडण्यावर भर द्या. एखाद्यानं परतफेड करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज कधीही घेऊ नये.
गुंतवणूकतुमची भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गुंतवणूक ही सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. दीर्घकालीन गुंतवणूक मोठी उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करते. याशिवाय तुमच्या नंतरच्या पिढीलाही आर्थिक सुरक्षा मिळते. तथापि, बरेच लोक दीर्घकालीन गुंतवणूकीचा मधल्या काळात वापर करतात. तुम्ही हे करू नका. ध्येय साध्य होईपर्यंत कोणत्याही दीर्घकालीन गुंतवणुकीला हात लावू नका.