लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: आयकर सवलत न मिळणाऱ्या पोस्टाच्या बचत योजनांच्या व्याजदरात केंद्र सरकारने शुक्रवारी वाढ केली. पीपीएफ व सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर पाच टक्के कायम ठेवला आहे. करपात्र उत्पन्न असणाऱ्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), ज्येष्ठ नागरिक बचत योजना व किसान विकास पत्र (केव्हीपी) यावरील व्याजदर १.१ टक्क्यांनी वाढविला आहे. पोस्टातील एक वर्षांच्या ठेवींवर ६.६ टक्के, दोन वर्षांच्या ठेवींवर ६.८ टक्के, ३ वर्षांच्या ठेवींवर ६.९ टक्के, तर ५ वर्षांच्या ठेवींवर ७% व्याज मिळेल.
- मासिक उत्पन्न योजनेच्या व्याजदरात ४० बेसिस पॉइंटने वाढ केली आहे. या योजनेचा व्याजदर आता ७.१ टक्के असेल.
- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांचा व्याजदर २० बेसिस पॉइंटने वाढवून ७ टक्के करण्यात आला आहे.
अल्पबचत योजनांवरील व्याजदर
योजना आधीचा दर नवा दर
बचत ठेव ४.०% ४.०%
१ वर्षाची ठेव ५.५% ६.६%
२ वर्षांची ठेव ५.७% ६.८%
३ वर्षांची ठेव ५.८% ६.९%
५ वर्षांची ठेव ६.७% ७.०%
५ वर्षांची आवर्ती ठेव ५.८% ५.८%
ज्येष्ठांची बचत योजना ७.६% ८.०%
मासिक उत्पन्न योजना ६.७% ७.१%
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ६.८% ७.०%
पीपीएफ ७.१% ७.१%
किसान विकास पत्र ७.०% ७.२%
(१२३ महिने) (१२० महिने)
सुकन्या समृद्धी योजना ७.६% ७.६%
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"