Property Rules : गेल्या काही वर्षात रिअय इस्टेट क्षेत्रात भरभराटी पाहायला मिळत आहे. विशेष करुन शहरी भागात तर प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडले आहेत. अशात अनेकजण प्रॉपर्टीत गुंतवणूक करत आहेत. तुमच्या मनात असाच विचार असेल तर काही गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. घर, दुकान किंवा प्लॉट यांसारख्या कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नोंदणी हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. मालमत्तेची नोंदणी केल्याने खरेदीदाराला मालमत्तेची कायदेशीर मालकी मिळते. यामध्ये साक्षीदार खूप महत्त्वाचा दुवा असतो.
जेव्हा एखादी मालमत्ता एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केली जाते, तेव्हा मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क यांसारखी काही आवश्यक देयके केल्यानंतर उप-निबंधक कार्यालयात नोंदणीद्वारे व्यवहाराची औपचारिकता करणे आवश्यक आहे. ही संपूर्ण प्रक्रिया प्रॉपर्टी रजिस्ट्री म्हणून ओळखली जाते. मालमत्तेची नोंदणी करताना २ साक्षीदारांचीही आवश्यकता असते, ज्यांच्यासमोर मालमत्तेचा व्यवहार होतो.
वाचा - श्रीमंत होण्यासाठी पॅसिव्ह उत्पन्न किती महत्त्वाचे? कसे वाढवावे कमाईचे स्त्रोत?
साक्षीदार ओळख तपासली जाते
कोणत्याही मालमत्तेच्या नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया भारतीय नोंदणी कायदा, १९०८ अंतर्गत केली जाते. या कायद्यामध्ये दस्तऐवजांची नोंदणी, पुरावे जतन करणे, फसवणूक रोखणे आणि मालकीची हमी सुनिश्चित करणे अशी तरतूद आहे. मालमत्तेची नोंदणी करताना तुम्ही ज्या २ साक्षीदारांना हजर करू इच्छिता त्यांना उपनिबंधकासमोर त्यांची ओळख पटवून द्यावी लागते. यासाठी साक्षीदाराचे अधिकृत ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा दाखवावा लागेल. यासोबतच साक्षीदारांची माहिती नोंदवण्याच्या प्रक्रियेत त्यांची बायोमेट्रिक ओळखही स्कॅन केली जाते.
प्रॉपर्टी रजिस्ट्रीमध्ये कोणाला साक्षीदार बनवता येईल?
आता आपण सर्वात महत्वाच्या मुद्द्याबद्दल बोलू. प्रॉपर्टी रजिस्ट्रीमध्ये कोणाला साक्षीदार बनवता येईल? १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती कोणत्याही मालमत्तेच्या नोंदणीमध्ये साक्षीदार होऊ शकते. पण, प्रॉपर्टी डीलमध्ये, दोनपैकी एक साक्षीदार विक्रेता किंवा खरेदीदार नसावा. नोंदणीच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान दोन्ही साक्षीदारांना हजर राहणे आवश्यक आहे.