Lokmat Money >गुंतवणूक > अंडर कंस्ट्रक्शन घर घ्यावे की रेडी टू मूव्ह? तुमच्यासाठी कोणतं फायदेशीर आहे?

अंडर कंस्ट्रक्शन घर घ्यावे की रेडी टू मूव्ह? तुमच्यासाठी कोणतं फायदेशीर आहे?

Why Under Construction Apartment is Good : नवीन घर खरेदी करायचं आहे, पण अंडर कंस्ट्रक्शन घ्यावे की रेडी टू? असा प्रश्न पडला आहे? तुमच्यासाठी कोणतं फायद्याचं आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 03:32 PM2024-10-20T15:32:20+5:302024-10-20T15:34:02+5:30

Why Under Construction Apartment is Good : नवीन घर खरेदी करायचं आहे, पण अंडर कंस्ट्रक्शन घ्यावे की रेडी टू? असा प्रश्न पडला आहे? तुमच्यासाठी कोणतं फायद्याचं आहे?

property under construction vs ready to move apartment which is good to buy | अंडर कंस्ट्रक्शन घर घ्यावे की रेडी टू मूव्ह? तुमच्यासाठी कोणतं फायदेशीर आहे?

अंडर कंस्ट्रक्शन घर घ्यावे की रेडी टू मूव्ह? तुमच्यासाठी कोणतं फायदेशीर आहे?

Why Under Construction Apartment is Good :  'घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून' अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आयुष्यात प्रत्येकाला एक ना एक दिवस या दोन्ही गोष्टी कराव्याच लागतात. शहरात राहणाऱ्यांना प्रत्यक्षात घर बांधण्याची गरज नाही. मात्र, ते बिल्डरकडून खरेदी करताना चांगलाच कस लागतो. घर किंवा फ्लॅट खरेदी करताना अनेकांचा खूप गोंधळ होतो. बांधकामाधीन (under construction) मालमत्तेत पैसे गुंतवावे की रेडी टी मूव्ह घर घ्यावं? दोन्ही पर्यायांचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. याबाबतीत तज्ज्ञांचे मत जरा वेगळं आहे. जर तुम्हाला घाई नसेल तर बांधकामाधीन मालमत्तेकडे जाणे अधिक फायदेशीर ठरू शकते. या प्रकारच्या मालमत्तेची मागणीही जास्त आहे.

कोरोनाच्या कालावधीनंतर बहुतांश ग्राहक बांधकामाखालील मालमत्ता खरेदीकडे वळले आहेत. प्रकल्प रखडणे किंवा वेळेवर ताबा न मिळणे ही समस्या असली तरी लोक अशा प्रकल्पांना पसंती देत आहेत.

RERA मुळे आत्मविश्वास वाढला
रिअल इस्टेट क्षेत्रात RERA (रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी) ची एन्ट्री झाल्यापासून गैरप्रकारांना बराच आळा बसला आहे. खरेदीदारांना आता मोठ्या आणि विश्वासार्ह लोकांकडून खरेदी करण्यात अधिक रस आहे. खाजगी गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहील याची खात्री हवी. रेराच्या नियम आणि सूचनांनुसार प्रकल्पांसाठी आता नोंदणी करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

गुंतवणुकीत वाढ
बांधकामाधीन अपार्टमेंटच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत तुमच्या घराच्या किमतीत वाढ होऊ शकते. गुंतवणूकदारांनी विचारशील आणि संयम राखणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत त्यांना कमी गुंतवणुकीवर अधिक नफा कमावण्याची संधी असते.

पेमेंटमध्ये लवचिकता
बांधकामाधीन प्रकल्पात तुम्हाला पेमेंटसाठी मोठा कालावधी मिळतो. अनेकदा बिल्डर गुंतवणुकदारांकडून पेमेंट अनेक हप्त्यांमध्ये घेतो. यामुळे गुंतवणूकदारांना अपार्टमेंटच्या किमतीनुसार पेमेंट करण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे घर खरेदीदारावर अचानक कर्जाचा डोंगर होत नाही.

किमतीत मोठी सूट
अंडर कंस्ट्रक्शन प्रकल्पात घर खरेदी करण्याचा एक मोठा फायदा म्हणजे बांधकाम तुमच्या डोळ्यांसमोर सुरू असते. याचा दर्जा तुम्ही तपासू शकतो. यात तुम्हाला आधुनिक वास्तुकला आणि सुविधांसह घर मिळते. अशा प्रकल्पांमध्ये मोठी सूट दिली जाते. बांधकाम व्यावसायिक आणि विकासक त्यांच्या नवीन प्रकल्पांवर विविध सवलती देतात.
 

Web Title: property under construction vs ready to move apartment which is good to buy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.