Lokmat Money >गुंतवणूक > सरकारी बँकेने व्याजदर वाढवले! ५५५ दिवस FD ठेवा अन् भरघोस फायदा मिळवा; पाहा, नवे दर

सरकारी बँकेने व्याजदर वाढवले! ५५५ दिवस FD ठेवा अन् भरघोस फायदा मिळवा; पाहा, नवे दर

Punjab And Sind Bank New FD Rates: सरकारी बँकेने आपल्या व्याजदरात मोठी वाढ केल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या, डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 04:21 PM2023-04-26T16:21:51+5:302023-04-26T16:25:01+5:30

Punjab And Sind Bank New FD Rates: सरकारी बँकेने आपल्या व्याजदरात मोठी वाढ केल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या, डिटेल्स...

punjab and sind bank fd rates hike govt bank now give interest rate big profits on 555 days of 7 35 percent | सरकारी बँकेने व्याजदर वाढवले! ५५५ दिवस FD ठेवा अन् भरघोस फायदा मिळवा; पाहा, नवे दर

सरकारी बँकेने व्याजदर वाढवले! ५५५ दिवस FD ठेवा अन् भरघोस फायदा मिळवा; पाहा, नवे दर

Punjab And Sind Bank New FD Rates: अलीकडेच RBI ने रेपो दरात वाढ न केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तत्पूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवल्यामुळे सर्व प्रकारची कर्जे महागली. मात्र, आता दुसरीकडे अनेकविध बँका व्याजदरात वाढ करताना दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांना मुदत ठेवींवर चांगले व्याजदर मिळत असल्याचे बोलले जात आहे. यातच एका सरकारी बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले असल्याची माहिती देण्यात येणार आहे. 

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब आणि सिंध बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. या वाढीनंतर आता बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या एफडीवर २.८० टक्के ते ६.२५ टक्के व्याज देत आहे. बँक ४०० दिवसांच्या विशेष एफडीवर ७.१० टक्के, ५५५ दिवसांच्या एफडीवर ७.३५ टक्के आणि ६०१ दिवसांच्या एफडीवर ७ टक्के व्याज देत आहे.

नवीन व्याजदर २० एप्रिलपासून लागू

बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, नवीन व्याजदर २० एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत. तुम्ही ऑनलाइन किंवा बँकेच्या शाखेत जाऊन उच्च व्याजदराचा लाभ घेऊ शकता. बँकेच्या वतीने एक कोटीपर्यंतच्या ठेवींवर २.८० टक्के, एक कोटी ते १०० कोटींपर्यंतच्या ठेवींवर २.९० टक्के, १०० कोटी ते ५०० कोटींपर्यंतच्या ठेवींवर ४.५० टक्के आणि ५०० ​​कोटींवरील ठेवींवर ५.०० टक्के व्याज देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर बँकेकडून ०.५० टक्के व्याज दिले जात आहे आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ०.१५ टक्के व्याज दिले जात आहे.

दरम्यान, ७ दिवस ते ३० दिवस – २.८० टक्के, ३१ दिवसांपासून ४५ दिवसांपर्यंत – ३.०० टक्के, ४६ दिवसांपासून ९० दिवसांपर्यंत – ४.६० टक्के, ९१ दिवस ते १७९ दिवस – ४.७५ टक्के, १८० दिवस ते ३६४ दिवस – ६.०० टक्के, एक वर्ष ते ३९९ दिवस – ६.४० टक्के, ४०० दिवसांच्या विशेष एफडीवर – ७.१० टक्के, ४०१ दिवस ते ५५४ दिवस – ६.४० टक्के, ५५५ दिवसांची विशेष एफडी – ७.३५ टक्के, ५५६ दिवस ते ६०० दिवस – ६.४० टक्के,  ६०१ दिवसांच्या विशेष एफडीवर -७.०० टक्के, ६०२ दिवसांपासून ते दोन वर्षांपर्यंत – ६.४० टक्के, दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपेक्षा कमी – ६.७५ टक्के, तीन वर्षांपासून ते १० वर्षे – ६.२५ टक्के असे नवे व्याजदर आहेत. 

(टीप - या लेखात केवळ गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: punjab and sind bank fd rates hike govt bank now give interest rate big profits on 555 days of 7 35 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.