Reliance AGM 2024 : 20 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅपसह रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance) देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. आतापर्यंत देशातील इतर कुठल्याही कंपनीला हा पल्ला गाठला आलेला नाही. देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी TCS चे मार्केट कॅपदेखील 17 लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. दरम्यान, आज रिलायन्सची सर्वसाधारण सभा (Reliance AGM 2024) झाली, ज्यात कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी घोषणा केली आहे.
जगातील 30 सर्वात मौल्यवान कंपन्यांमध्ये रिलायन्सचे नाव असेल
एजीएम दरम्यान गुंतवणूकदारांना संबोधित करताना मुकेश अंबानी म्हणाले की, आपले भविष्य आपल्या भूतकाळापेक्षा खूप उज्ज्वल आहे. रिलायन्सला जागतिक स्तरावरील पहिल्या 500 कंपन्यांमध्ये सामील होण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ लागला. पण, पुढील दोन दशकांमध्ये आपण जगातील टॉप-50 सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत सामील झालो. पण, लवकरच रिलायन्स जगातील टॉप-30 कंपन्यांमध्ये सामील होईल.
जगातील 45वी सर्वात मोठी कंपनी
सुमारे 21 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह RIL ही भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. तर, जागतिक स्तरावर रिलायन्स जगातील 45वी सर्वात मोठी कंपनी आहे. यूएस डॉलरच्या दृष्टीने पाहिल्यास, RIL चे एम-कॅप $250 बिलियन जवळ आहे. विशेष बाब म्हणजे, देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी TCS चे मार्केट कॅप 17 लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे.
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स मिळणार?
मुकेश अंबानी यांनी एजीएमदरम्यान आपल्या गुंतवणूकदारांना एकावर एक बोनस शेअर जारी करण्यावर विचार करणार असल्याची घोषणा केली. याचाच अर्थ रिलायन्सच्या एका शेअरवर गुंतवणूकदारांना 1 शेअर देण्यात येऊ शकतो. यासाठी 5 सप्टेंबर रोजी संचालक मंडळाची बैठक पार पडेल. व्यवसायाचा विस्तार आणि मजबूत फायनान्शिअल परफॉर्मन्स पाहता कंपनीने ही घोषणा केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
दिवाळीला लॉन्च होणार Jio Ai Cloud, युजरला मिळणार मोफत 100 GB स्टोरेज...