Lokmat Money >गुंतवणूक > ना मुकेश, ना नीता, ना ईशा...अंबानी कुटुंबातील या व्यक्तीकडे रिलायन्सचे सर्वाधिक शेअर्स

ना मुकेश, ना नीता, ना ईशा...अंबानी कुटुंबातील या व्यक्तीकडे रिलायन्सचे सर्वाधिक शेअर्स

जाणून घ्या अंबानी कुटुंबात कोणाकडे किती शेअर्स आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 07:29 PM2024-03-07T19:29:27+5:302024-03-07T19:30:05+5:30

जाणून घ्या अंबानी कुटुंबात कोणाकडे किती शेअर्स आहेत...

Reliance Ambani Family: Neither Mukesh, nor Neeta, or Isha Ambani, Kikilaben Ambani holds the most shares of Reliance | ना मुकेश, ना नीता, ना ईशा...अंबानी कुटुंबातील या व्यक्तीकडे रिलायन्सचे सर्वाधिक शेअर्स

ना मुकेश, ना नीता, ना ईशा...अंबानी कुटुंबातील या व्यक्तीकडे रिलायन्सचे सर्वाधिक शेअर्स

Reliance Ambani Family: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) सातत्याने त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries)  च्या विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी आपल्या व्यवसायात अंबानी कुटुंबातील नवीन पिढीलाही सामील करुन घेतले आहे. आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांचा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे. 

या तिन्ही भाऊ-बहिणींना बोर्डात सामील करण्याच्या प्रस्तावाला गेल्या वर्षीच भागधारकांनी मंजुरी दिली होती. दरम्यान, या तिघांकडेही रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये समान हिस्सा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, एवढीच हिस्सेदारी कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्याकडे आहे. तर, मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन धीरूभाई अंबानी यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वाधिक शेअर्स आहेत.

कोणाकडे किती शेअर्स ?
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, प्रमोटर्सकडे डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीमध्ये 50.30 टक्के हिस्सा होता. तर, सार्वजनिक भागीदारी 49.70 टक्के आहे. अंबानी कुटुंबातील सहा प्रमोटर्समध्ये मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यांचा समावेश आहे. याशिवाय मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन धीरूभाई अंबानी यांच्याकडेही शेअर्स आहेत. कोकिलाबेन यांच्याकडे कंपनीत 1,57,41,322 शेअर्स किंवा 0.24 टक्के हिस्सा आहे. तो कंपनीतील सर्वात मोठा वैयक्तिक हिस्सा आहे. याशिवाय मुकेश अंबानींची तीन मुले, म्हणजे ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यांच्याकडे अनुक्रमे रिलायन्स इंडस्ट्रीजचे 80,52,021 शेअर्स किंवा 0.12 टक्के हिस्सा आहे.
आहे.

आज शेअर्समध्ये मोठी घसरण
आज रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. शेअर 1.60% घसरुन 2958.10 रुपयांवर बंद झाला. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 20 लाख कोटी रुपये आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Reliance Ambani Family: Neither Mukesh, nor Neeta, or Isha Ambani, Kikilaben Ambani holds the most shares of Reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.