Reliance Industries Q2 Results: देशातील सर्वात मोठी खाजगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2024-25 च्या जुलै-सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. दुस-या तिमाहीत कंपनीचा महसूल 2.35 लाख कोटी रुपये राहिला, तर निव्वळ नफा 16,563 कोटी रुपये आहे. हा मागील वर्षीच्या याच तिमाहीत 17,394 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यापेक्षा 5 टक्के कमी आहे. परंतु चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील 15,138 कोटी रुपयांपेक्षा 9.4 टक्के अधिक आहे.
डिजिटल सेवा-अपस्ट्रीम व्यवसायात मोठी वाढनियामक फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचा महसूल 2.35 लाख कोटी रुपये राहिला, तर पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल 236,217 कोटी रुपये होता. अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, डिजिटल सेवा आणि अपस्ट्रीम व्यवसायातील उत्कृष्ट वाढीमुळे दमदार कामगिरी दिसून येत आहे.
ARPU 7.4 टक्क्यांनी वाढलारिलायन्स जिओने सांगितले की, प्रति वापरकर्ता सरासरी महसूल 7.4 टक्क्यांनी वाढून 195.1 रुपये झाला आहे. दरवाढीचा संपूर्ण परिणाम पुढील 2-3 तिमाहीत दिसून येईल. Jio च्या 5G ग्राहकांची संख्या 148 मिलियन झाली आहे.
रिलायन्स रिटेलचा महसूल 76302 कोटी रुपये समूहाची रिटेल कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचा निव्वळ महसूल दुसऱ्या तिमाहीत 76,302 कोटी रुपये राहिला, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 77,148 कोटी रुपये होता. तर, कंपनीचा नफा 2836 कोटी रुपये झाला आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 2800 कोटी रुपये होता. कंपनीने सांगितले की, तिमाही EBITDA 5850 कोटी रुपये होता, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 5830 कोटी रुपये होता. सर्व फॉरमॅटमध्ये फूटफॉल 297 दशलक्ष (29.7 कोटी) आहे.