Lokmat Money >गुंतवणूक > ७२,११४,१४४ हे तीन नंबर लक्षात ठेवा, बनू शकता श्रीमंत; पाहा काय आहे हा गुंतवणूकीचा नियम

७२,११४,१४४ हे तीन नंबर लक्षात ठेवा, बनू शकता श्रीमंत; पाहा काय आहे हा गुंतवणूकीचा नियम

कोणत्याही आर्थिक समस्येपासून वाचण्यासाठी एक गोष्ट करण्यासाठी कायम सांगितली जाते आणि ती म्हणजे बचत. गुंतवणूकीचा 72, 114, 144 हे नियम काय आहेत हे पाहू.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 12:22 PM2023-07-31T12:22:41+5:302023-07-31T12:23:07+5:30

कोणत्याही आर्थिक समस्येपासून वाचण्यासाठी एक गोष्ट करण्यासाठी कायम सांगितली जाते आणि ती म्हणजे बचत. गुंतवणूकीचा 72, 114, 144 हे नियम काय आहेत हे पाहू.

Remember these three numbers 72 114 144 you can become rich See what this investment rule investment tips more returns | ७२,११४,१४४ हे तीन नंबर लक्षात ठेवा, बनू शकता श्रीमंत; पाहा काय आहे हा गुंतवणूकीचा नियम

७२,११४,१४४ हे तीन नंबर लक्षात ठेवा, बनू शकता श्रीमंत; पाहा काय आहे हा गुंतवणूकीचा नियम

Rule of 72, 114, 144: दर महिन्याला सॅलरी येते परंतु ती लगेच खर्च होते. खर्चाच्या या चक्रानं तुमची आर्थिक स्थितीही खराब केलीये? कोणत्याही आर्थिक समस्येपासून वाचण्यासाठी एक गोष्ट करण्यासाठी कायम सांगितली जाते आणि ती म्हणजे बचत. बचत करून तुम्ही कालांतरानं एक मोठी रक्कमदेखील उभी करू शकता. आज आपण बचत आणि गुंतवणूकीचे तीन फॉर्म्युले पाहू ज्याच्या मदतीनं तुम्ही मोठी रक्कम निर्माण करू शकता.

पहिला नियम
रुल ऑफ 72 इन्व्हेस्टमेंट - प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो की आपले पैसे दुप्पट कधी होणार. अशा परिस्थितीत तुमची किती कमाई होईल हे सांगणारा हा नियम आहे. समजा तुमच्याकडे फक्त 20,000 रुपये आहेत. हे पैसे गुंतवा आणि तुम्हाला मिळणारे रिटर्न खर्च करा. पण रक्कम दुप्पट कधी होईल (How to double investment) यासाठी आहे तो म्हणजे रुल ऑफ 72. इन्व्हेस्टमेंट स्कीम जितका व्याज देते त्यानं 72 ला भागा.

उदाहरण म्हणून समजून घ्यायचं असेल तर 72 ला 8 नं भागल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळेल 9. जर तुम्हाला गुंतवणूकीवर 8 टक्क्यांचं व्याज मिळतं तर 9 वर्षांमध्ये तुमची रक्कम दुप्पट होईल. खाली दिलेला चार्ट पाहून तुम्ही किती वर्षात रक्कम दुप्पट होईल हे पाहू शकता.

रुल ऑफ 114
जर तुम्हाला तुमची रक्कम तिप्पट करायची असेल तर तुम्हाला रुल ऑफ 114 मदत करेल. हा फॉर्म्युला रुल ऑफ 72 चाच आहे, परंतु नंबर्स मात्र बदलतील. तुम्ही व्याजाच्या आधारे केव्हा पैसे तिप्पट होतील हे पाहू शकता. जर तुम्ही 8 टक्के दरानं गुंतवणूक करत असाल, तर अशात 114 ला 8 नं भागा. तेव्हा त्याचं उत्तर येईल 14.2. याचाच अर्थ 14 वर्षांमध्ये तुमचे पैसे तिप्पट होतील.

रुल ऑफ 144
आता पाहू की रुल ऑफ 144 नक्की काय आहे. यावरून तुमचा पैसा किती वर्षांमध्ये चौपट होईल हे समजून जाईल. जर तुम्ही 12 टक्के व्याजावर 10000 रुपये गुंतवले असतील तर त्याचं मूल्य 40000 होण्यासाठी तुम्हाला 12 वर्ष लागतील. यामध्येही तुम्हाला 144 ला 12 नं भागावं लागेल. यावरून तुमचा पैसा किती वर्षात चौपट होईल हे दिसून येईल.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Remember these three numbers 72 114 144 you can become rich See what this investment rule investment tips more returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.