Join us  

Retirement Plan: या सरकारी प्लॅनमध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळतील ११ हजार; पेन्शनचं टेन्शन नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 10:28 PM

LIC Jeevan Shanti Policy: तुम्ही तुमच्या नोकरीदरम्यान हुशारीने गुंतवणूक करून स्वतःसाठी चांगल्या पेन्शनची व्यवस्था करू शकता. अशीच एक पॉलिसी एलआयसी ऑफर करत आहे.

सरकारी नोकरी असो वा खासगी कर्मचारी, त्या व्यक्तीला सर्वात मोठी चिंता निवृत्तीची असते. निवृत्तीनंतर दर महिन्याला एकरकमी पैसे मिळत राहिले तर आयुष्य आरामात जातं. अशा स्थितीत नोकरी करण्यासोबतच पेन्शनचीही व्यवस्था करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी स्कीमबद्दल (LIC Jeevan Shanti Policy) सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला दरमहा ११ हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास अनेक फायदे मिळतात. जाणून घेऊया या स्कीमबद्दल अधिक माहिती.

आम्ही ज्या स्कीमबद्दल बोलत आहोत ती म्हणजे LIC ची न्यू जीवन शांती पॉलिसी. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनाचा लाभ घेऊ शकता. एलआयसीनं गेल्या काही महिन्यांत आपल्या न्यू जीवन शांती स्कीममध्ये काही बदल केले होते. याअंतर्गत आता या स्कीमसाठी अर्ज करणाऱ्या नवीन पॉलिसीधारकांना अधिक व्याज मिळणार आहे. या स्कीम अंतर्गत तुम्ही मर्यादित गुंतवणुकीत अधिक नफा मिळवू शकता.

असं मिळेल पेन्शनLIC ची नवीन जीवन शांती पॉलिसी एक नॉन लिंक्ड प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला वार्षिक प्रीमियम भरावा लागेल. पॉलिसीधारकाला पेन्शन कधी घ्यायचं आहे याचेही पर्याय प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत. ५, १०, १५ किंवा २० वर्षांनंतर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. पेन्शन ग्राहकानं निवडलेल्या वेळेनुसार सुरू होईल. एलआयसीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दरमहा पेन्शन मिळते. या स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम मिळू शकते. ज्यांना एकरकमी रक्कम जमा करून तत्काळ पेन्शन मिळवायचं असेल तर त्याचाही लाभ घेता येऊ शकतो.

प्लॅननुसार सिंगल लाइफसाठी डिफर्ड ॲन्युइटीच्या बाबतीत, तुम्हाला १० लाख रुपयांची पॉलिसी खरेदी करून ११,१९२ रुपये मासिक पेन्शन मिळू शकतं. कम्युनिटी लाईफसाठी डिफर्ड ॲन्युइटीच्या बाबतीत मासिक पेन्शन १०,५७६ रुपये असू शकते.

टॅग्स :एलआयसीनिवृत्ती वेतन