Join us

Retirement Planning: 'या' ५ चुका नक्की टाळा, रिटायरमेंटनंतर तुमच्याकडे असेल पैसाच पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 10:53 AM

रिटायरमेंट प्लॅनिंग किती गरजेचं आहे, याचं महत्त्व बहुतांश लोकांना माहितच असेल.

रिटायरमेंट प्लॅनिंग (Retirement Planning) किती गरजेचं आहे, याचं महत्त्व बहुतांश लोकांना माहितच असेल. रिटायरमेंटनंतर कोणतंही काम न करता पैसा हवा असेल तर पेन्शन प्लॅन घेणं आवश्यक आहे. अशातच लोक सेव्हगची मदत घेतात. रिटायरमेंटचं प्लॅनिंग तर अनेक जण करतात. पण हे करताना ते काही चुकाही करतात. आज आपण अशाच पाच चुकांबाबत जाणून घेणार आहोत, जे प्रामुख्यानं लोक रिटारमेंट प्लॅनिंगदरम्यान करतात.

EPF वर अधिक अवलंबून राहणंईपीएफनं सेव्हिंग होतं, असा विचार करुन अनेक तरुण काही वेगळा प्लॅन घेत नाहीत. याचे व्याज दर सरकारकडून ठरवले जातात आणि बाजारात यापेक्षाही काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. यातला चांगला पर्याय म्हणजे एनपीएस. त्यामुळेच ईपीएफवर अधिक अबलंबून राहू नका आणि अन्य पर्यायांचाही विचार करा.

नोकरी बदलण्यापूर्वी ईपीएफ ट्रान्सफर न करणंबर्‍याचदा असं दिसून येतं की, नोकऱ्या बदलल्यानंतर लोक त्यांच्या ईपीएफचे पैसे जुन्या कंपनीतून नवीन कंपनीकडे ट्रान्सफर करत नाहीत. यामुळे त्यांना व्याजाचं नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे नोकरी बदलल्यानंतर जुन्या कंपनीचे ईपीएफचे पैसे नवीन कंपनीकडे नक्कीच ट्रान्सफर करा.

उशिरा सेव्हिंग सुरू करणंनोकरी लागल्यानंतर सुरुवातीला आताच रिटारयमेंटसाठी पैसे का वाचवावे, याबद्दल नंतर विचार करू असं म्हणतात. परंतु तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितकं तुम्हालाच पैसे अधिक मिळतील. तुम्हाला रिटायरमेंटपर्यंत एक निश्चित रक्कम हवी असेल कर लवकर गुंतवणूक सुरू करा. तेव्हाच तुम्हाला रिटारमेंटपर्यंत अधिक पैसा मिळेल. जर तुम्हाला रिटारमेंटपर्यंत निश्चित रक्कम हवी असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करावी लागेल. सुरुवातीलाच हे काम केल्यास तुम्हाला रिटारमेंटनंतर अधिक रक्कम मिळेल.

६० वर्ष रिटारमेंटचं वय मानणंअधिकृतरित्या रिटायरमेंटचं वय ६० वर्षे आहे, परंतु आजकाल लोक अधिक तणावाखाली काम करतात. अशातच ६० व्या वर्षापर्यंत काम करणं कठीण होतं. जर तुम्ही नोकरी लागल्यानंतर लगेचच रिटारमेंट प्लॅनिंग सुरू केलं, तर तुम्ही ६० व्या च वर्षी रिटारयर व्हावं हे गरजेचं नाही. तुम्ही त्यापूर्वीही रिटायरमेंट घेऊ शकता.

महागाईकडे दुर्लक्ष करणंबहुदा लोक रिटायरमेंटसाठी सेव्हिंग करताना त्या पैशांचं २०-२५ वर्षांनंतर मूल्य काय राहिल याचा विचार करत नाहीत. रिटायरमेंट प्लॅनिंग करताना महागाईकडे दुर्लक्ष केलं जातं. आताच्याच हिशोबानं गुंतवणूक केली जाते. अशातच त्यांना रिटारमेंटनंतर जे पेन्शन मिळतं ते फार कमी असतं. त्यामुळे खर्चदेखील योग्यरित्या करता येत नाही.

टॅग्स :गुंतवणूकपैसा