Join us  

चाळीशी उलटली पण रिटायरमेंट प्लॅनिंग नाही? असं करा नियोजन, १० कोटींपर्यंत निधी होईल जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 1:15 PM

Retirement Planning : तुम्ही जितक्या लवकर निवृत्तीचे नियोजन सुरू कराल तितके चांगले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एखाद्या व्यक्तीचे वय 40 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तरीही त्याच्याकडे सेवानिवृत्तीसाठी बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी पुरेसा वेळ आहे.

Retirement Planning : आपल्या पहिल्या पगारापासूनच निवृत्तीचं आर्थिक नियोजन करायला पाहिजे असं म्हणतात. कारण, अशा स्टेजला बहुतेक लोक हे अविवाहित असतात. त्यामुळे जबाबदाऱ्या कमी असल्याने  जास्तीत जास्त बचत करू शकता. मात्र, अनेकदा कुणाचं मार्गदर्शन नसल्याने म्हणा किंवा थोडी हौसमौज करण्याच्या नादात आपलं निवृत्तीचं नियोजन राहून जातं. मात्र, तुम्ही चाळीशीत असाल किंवा वयाची चाळीशी ओलांडली असेल तर आत्तापासूनच निवृत्तीचे नियोजन करणे आवश्यक आहे. भारतात साधारणपणे ६० वर्षे हे निवृत्तचं वय समजलं जातं. अशात तुमच्याकडे अजूनही १५ ते २० वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. यामध्ये तुम्ही निवृत्तीवेळी तुम्ही मोठा निधी जमा करू शकता. त्यांसाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.  निवृत्ती नियोजनाचा पहिला नियमवयाच्या चाळीशीपर्यंत आपला पगार म्हणा किंवा उत्पन्न बऱ्यापैकी वाढलेले असते. बचत आणि गुंतवणुकीसाठी आता मोठी रक्कम आपल्याकडे आहे. शिवाय गुंतवणूक आणि नियोजन करण्यासाठी १५ ते २० वर्षे शिल्लक आहेत. मात्र, यासाठी एवढेच पुरेसे नाही. कारण, या वयाच्या टप्प्यावर तुमच्या जबाबदाऱ्याही वाढलेल्या असतात. मुलांची शिक्षण, घर, गाडी किंवा अन्य हप्ते, इन्कम टॅक्स, आरोग्याचा खर्च, बचत आणि गुंतवणूक या सर्व गोष्टी निवृत्तीपर्यंत सांभाळायच्या आहेत. त्यामुळे या सर्वांचा विचार करुन नियोजन करण्यास सुरुवात करायची.

निवृत्तीनंतर तुम्हाला किती निधी हवा?निवृत्तीचे नियोजन करताना तुम्हीला वार्षिक किती पैसे आवश्यक असतील? याचे गणित मांडा. समजा सध्या तुमचे वय ४१ आहे. सध्या तुमचा वार्षिक खर्च १२ लाख रुपये इतका आहे. आता तुम्ही २० वर्षानंतर निवृत्त होणार आहात. त्यावेळी तुम्हाला २०-३० टक्के फंड हवा आहे. अशात महागाईचा दर ६% टक्के मानला तर तुमचा वार्षित खर्च निवृत्तीनंतर ३८.४८ लाख इतका असेल. याचा अर्थ तुम्हाला ९.६२ कोटी रुपयांचा निधी निवृत्तीनंतर हवा आहे.

गुंतवणुकीसाठी या धोरणाचा अवलंब कराकेवळ उत्पन्न वाढवून उपयोग नाही. त्याची योग्य गुंतवणूक केली तरच तुम्ही इच्छित ध्येय साधू शकता. कमी पैशात जास्त बचत करायची असेल तर गुंतवणुकीत वैविध्य आणणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच सर्व पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नये, असं तज्ञ सांगतात. 

  • राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस)
  • एसआयपीमार्फत म्युच्युअल फंडात गुंतवणूक
  • पीपीएफ
  • ईपीएफ
  • या योजनांचा विचार करू शकता.

(Disclaimer- यामध्ये गुंतवणुकीची माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपीपीएफशेअर बाजार