ट्रक एग्रीगेटर LetsTransport ने सिरीज ई फंडिंग राउंडद्वारे (Startup Funding) अलीकडेच $22 मिलियन, म्हणजे सुमारे 183 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. ही कंपनी ट्रक्सच्या एग्रीगेटरप्रमाणे विविध व्यवसायांना सेवा प्रदान करते. यामुळे वाहतूक सुलभ करण्याचा प्रयत्न केला जातो. विशेष म्हणजे, कंपनीचे सह-संस्थापक सुदर्शन रवी झा, यांचे वडील एक LIC एजंट होते. एका एलआयसी एजंटच्या मुलाने 700 कोटी रुपयांचे स्टार्टअप उभारले आहे.
या फंडिंग राउंडचे नेतृत्व Bertelsmann India Investments (BII) ने केले, ज्यांनी एकट्याने $16 मिलियनची गुंतवणूक केली आहे. तसेच मागील फेरीत $20 मिलियनची गुंतवणूक केली होती. याशिवाय रीब्राईट पार्टनर्स, एनबी व्हेंचर्स, एएलईएस ग्लोबल, स्ट्राइड व्हेंचर्स आणि सीएसी कॅपिटल यांनीही कंपनीत गुंतवणूक केली आहे. Bertelsmann India Investments (BII) चे भागीदार रोहित सूद म्हणाले की 2019 मध्ये या स्टार्टअपसोबत भागीदारी झाल्यापासून कंपनीने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
2015 मध्ये कंपनीची सुरुवात 2015 मध्ये पुष्कर सिंग, सुदर्शन रवी झा आणि IIT खरगपूरमधून शिकलेले अंकित पराशर यांनी ही कंपनी सुरू केली होती. ही कंपनी सर्व व्यवसायांना वाहतुकीसाठी ट्रक सेवा पुरवते. हे ट्रक ऑपरेटर्ससह कंपन्यांना लिंक प्रदान करते. असंघटित लॉजिस्टिक उद्योगाला संघटित करणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. एका अंदाजानुसार, लॉजिस्टिक उद्योगाचे मूल्य सुमारे 200 अब्ज डॉलर्स आहे.
कोण आहेत सुदर्शन रवी झा? सुदर्शनचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील एलआयसी एजंट होते तर आई गृहिणी होती. सुदर्शन यांनी 2008 मध्ये IIT खरगपूरमधून शिक्षण घेतले. बालपणी सुदर्शनला आयएएस अधिकारी व्हायचे होते. कॉलेज झाल्यानंतर त्यांनी Accenture आणि JP मॉर्गनसारख्या मोठ्या कंपनीतही काम केले. यानंतर 2015 मध्ये त्यांनी आपल्या मित्रांसह हा स्टार्टअप सुरू केला, ज्यातून आज 700 कोटींहून अधिक कमाई झाली आहे.