Lokmat Money >गुंतवणूक > १०० रुपये वाचवून Post Office च्या 'या' स्कीममध्ये गुंतवा, ५ वर्षांत जमतील लाखो रुपये

१०० रुपये वाचवून Post Office च्या 'या' स्कीममध्ये गुंतवा, ५ वर्षांत जमतील लाखो रुपये

Post Office Investment Scheme : भविष्य सुरक्षित करायचं असेल तर गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या क्षमतेनुसार गुंतवणूक केली पाहिजे, कारण यातूनच पैसा वाढवण्यासही मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 02:27 PM2024-11-12T14:27:31+5:302024-11-12T14:32:50+5:30

Post Office Investment Scheme : भविष्य सुरक्षित करायचं असेल तर गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या क्षमतेनुसार गुंतवणूक केली पाहिजे, कारण यातूनच पैसा वाढवण्यासही मदत होते.

Save 100 rupees and invest in post office recurring scheme 5 years you will get lakhs of rupees | १०० रुपये वाचवून Post Office च्या 'या' स्कीममध्ये गुंतवा, ५ वर्षांत जमतील लाखो रुपये

१०० रुपये वाचवून Post Office च्या 'या' स्कीममध्ये गुंतवा, ५ वर्षांत जमतील लाखो रुपये

Post Office Investment Scheme : भविष्य सुरक्षित करायचं असेल तर गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या क्षमतेनुसार गुंतवणूक केली पाहिजे, कारण यातूनच पैसा वाढवण्यासही मदत होते. घरातील मुलांनाही लहानपणापासून बचतीसह गुंतवणुकीचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. जर तुम्ही मोठी रक्कम गुंतवू शकत नसाल तर थोडी बचत वाचवून ती गुंतवा, त्यातून भरपूर पैसेही जोडू शकता. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही सरकारी योजनांमध्येही गुंतवणूक करू शकता.

जोखीममुक्त आणि निश्चित कमाई देणारी अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. याला पोस्ट ऑफिस आरडी असंही म्हणतात. पोस्ट ऑफिसची ही स्कीम ५ वर्षांसाठी आहे. दररोज फक्त १०० रुपयांची बचत करूनही तुम्ही यात गुंतवणूक केली तर ५ वर्षात लाखो रुपयांची भर पडू शकते.

दररोज करावी लागेल १०० रुपयांची गुंतवणूक

रोज १०० रुपयांची बचत केली तर महिन्याला तुम्ही ३,००० रुपये जमवू शकाल. अशा प्रकारे तुम्ही दर महा पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये ३,००० रुपये गुंतवू शकता. ३,००० प्रमाणे तुम्ही वार्षिक ३६,००० रुपये जमा कराल. अशा प्रकारे तुम्ही ५ वर्षात एकूण १,८०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. सध्या या योजनेवर ६.७ टक्के व्याज मिळत आहे. 

यानुसार ५ वर्षात तुम्हाला ३४,०९७ रुपये व्याज आणि मॅच्युरिटीवर २,१४,०९७ रुपये मिळतील. अशा प्रकारे थोडी बचत केल्यास तुम्ही चांगली रक्कम जोडू शकाल. पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, पोस्ट ऑफिसमध्ये १०० रुपयांमध्ये आरडी खातं उघडता येतं, तर गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही.

कर्जही घेता येणार

पोस्ट ऑफिसमधील आरडी खात्यावर गरजेच्या वेळी कर्जही घेऊ शकता. नियमानुसार १२ हप्ते जमा केल्यानंतर खात्यात जमा रकमेच्या ५० टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येतं. कर्जाची परतफेड एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. कर्जाचा व्याजदर आरडीवरील व्याजापेक्षा २% जास्त असेल. त्यात नॉमिनेशनची सुविधाही आहे.

मुदतवाढही मिळेल

जर तुम्हाला ५ वर्षांनंतरही आरडीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पुढील ५ वर्षांसाठी वाढवू शकता. विस्तारित खात्यावर तेच व्याज मिळेल जे खाते उघडताना लागू होतं. मुदतवाढीदरम्यान खातं केव्हाही बंद केलं जाऊ शकतं. यामध्ये आरडी खात्याचा व्याजदर पूर्ण वर्षांसाठी लागू असेल आणि एक वर्षापेक्षा कमी वर्षासाठी बचत खात्यानुसार व्याज दिले जाईल. 

उदाहरणार्थ, जर तुम्ही एक्सटेंडेड अकाउंट २ वर्ष ६ महिन्यांनंतर बंद केलं तर २ वर्षावर तुम्हाला ६.७% दरानं व्याज मिळेल, तर ६ महिन्यांच्या रकमेवर तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्यानुसार ४% दरानं व्याज मिळेल.

मॅच्युरिटीपूर्वी बंद करण्याचे नियम

गरज पडल्यास खातं उघडल्याच्या तारखेपासून तीन वर्षांनी ते बंद करू शकता. पण जर तुम्ही मॅच्युरिटी पीरियडच्या एक दिवस आधीही हे खातं बंद केलं तरीही तुम्हाला पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटइतकं व्याज दिलं जातं. सध्या पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर ४ टक्के व्याज मिळत आहे.

Web Title: Save 100 rupees and invest in post office recurring scheme 5 years you will get lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.