Lokmat Money >गुंतवणूक > २० व्या वर्षापासून वाचवा केवळ ₹५०० रुपये; रिटायरमेंटपर्यंत मिळतील ६० लाख, जाणून घ्या

२० व्या वर्षापासून वाचवा केवळ ₹५०० रुपये; रिटायरमेंटपर्यंत मिळतील ६० लाख, जाणून घ्या

वयाच्या 20 व्या वर्षापासून दोन नियम नीट पाळलेत तर निवृत्तीपर्यंत तुमच्याकडे चांगला फंड जमा होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 05:22 PM2023-08-25T17:22:08+5:302023-08-25T17:22:33+5:30

वयाच्या 20 व्या वर्षापासून दोन नियम नीट पाळलेत तर निवृत्तीपर्यंत तुमच्याकडे चांगला फंड जमा होऊ शकतो.

Save only 500 rs monthly from age of 20 year get rs 60 lakh by retirement 40 years mutual fund | २० व्या वर्षापासून वाचवा केवळ ₹५०० रुपये; रिटायरमेंटपर्यंत मिळतील ६० लाख, जाणून घ्या

२० व्या वर्षापासून वाचवा केवळ ₹५०० रुपये; रिटायरमेंटपर्यंत मिळतील ६० लाख, जाणून घ्या

आपण श्रीमंत व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु त्यासाठी आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे. तुम्हाला फक्त संयम आणि शिस्त पाळावी लागेल. जर तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षापासून हे दोन नियम नीट पाळलेत तर निवृत्तीपर्यंत तुमच्याकडे चांगला फंड जमा होऊ शकतो.

गुंतवणूक जितकी चांगली असेल आणि दीर्घकालावधीसाठी असेल, तितके त्याचे रिटर्नही चांगले मिळतील. अशा अनेक स्कीम्स आहेत, ज्यात दीर्घकालावधीसाठी ५०० रुपयांची गुंतवणूक करत राहिलात तर तुम्ही काही वर्षांमध्ये लाखोंची रक्कम जोडू शकता. पाहूया जर तुम्ही ५०० रुपयांची गुंतवणूक केली तर त्यावर किती रिटर्न मिळेल. 

दरमहा 500 रुपयांची गुंतवणूक
एसआयपीद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. दरम्यान, एसआयपीही बाजाराशी लिंक्ड आहे आणि यात मोठी जोखीम मानली जाते. परंतु गेल्या काही वर्षांत एसआयपीमध्ये खूप चांगला परतावा मिळाला आहे. यामुळेच गेल्या काही दिवसांत एसआयपीची लोकप्रियताही झपाट्यानं वाढलीये. एसआयपीमध्ये सरासरी 12 टक्के परतावा मिळतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. अशा परिस्थितीत, लोक दीर्घकाळात एसआयपीद्वारे भरपूर नफा कमावतात. चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार एसआयपीमध्ये गुंतवलेली रक्कम कधीही वाढवू शकता. यामुळे तुमचा नफा अधिक होतो.

तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) दरमहा 500 रुपये गुंतवायला सुरुवात केली तर तुमची गुंतवणूक दरवर्षी 6000 रुपये होईल. अशा प्रकारे, 40 वर्षांसाठी तुम्ही एसआयपीमध्ये एकूण 2.40 लाख रुपये गुंतवाल. 12 टक्के परताव्यानुसार मॅच्युरिटी पर्यंत एकूण परतावा 57,01,210 रुपये असेल. म्हणजे तुमची एकूण रक्कम 59,41,210 रुपये होईल.

(टीप - यात सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Save only 500 rs monthly from age of 20 year get rs 60 lakh by retirement 40 years mutual fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.