सोनं, रिअल इस्टेट आणि शेअर बाजारात लोक गुंतवणूक वाढवत आहेत, पण कर्ज घेऊन केलेल्या सर्व कामांमुळे त्यांची आर्थिक जबाबदारीही वाढत आहे. त्यामुळे निव्वळ आर्थिक बचत कमी होताना दिसतेय. गेल्या तीन वर्षांत कुटुंबांची आर्थिक जबाबदारी दुपटीनं वाढली आहे. त्याचवेळी त्यांची निव्वळ आर्थिक बचत जवळपास ४० टक्क्यांनी घटली आणि ती ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली. स्ट्रॅटजिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनकडून जारी नॅशनल अकाऊंट स्टॅटिस्टिक्स २०२४ मधून हे चित्र समोर आलं आहे.
बचतीचा पॅटर्न
आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ४० हजार ५०५ कोटी रुपयांवरून ती आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ६३ हजार ३९७ कोटी रुपयांवर पोहोचली. शेअर्स आणि डिबेंचरमधील गुंतवणूक जवळपास दुप्पट होऊन २.०६ लाख कोटी रुपये झाली आहे. त्याचबरोबर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जवळपास तिप्पट झाली. आर्थिक वर्ष २०२१ मधील ६४ हजार ८४ कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ती वाढून १ लाख ७९ हजार कोटी रुपये झाली. या काळात अल्पबचत योजनांची गुंतवणूक २ लाख ४८ हजार कोटीरुपयांवरून २ लाख ३८ हजार कोटी रुपयांवर आली आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ती २ लाख ४१ हजार कोटी रुपये होता.
आर्थिक दायित्व
२०१८-१९ मध्ये आर्थिक दायित्व ७,७१,२४५ कोटी रुपये होतं. पुढील आर्थिक वर्षात ते ७,७४,६९३ कोटी रुपयांवर पोहोचलं, २०२०-२१ या आर्थिक वर्षात ते ७,३७,३५० कोटी रुपये झालं. मात्र, आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ते वाढून ८ लाख ९९ हजार २७१ कोटी रुपये झालं. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये हा आकडा १५ लाख ५७ हजार १९० कोटी रुपयांवर पोहोचला आणि आर्थिक दायित्व अधिक झालं. आर्थिक वर्ष २०२१ मधील ६ लाख ५ हजार कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२३ मध्ये बँकांचं कर्ज ११ लाख ८८ हजार कोटी रुपयांपर्यंत जवळपास दुप्पट झालं आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ते ७ लाख ६९ हजार कोटी रुपये होतं.
निव्वळ बचत
एकूण आर्थिक बचतीतून वित्तीय दायित्वं वजा केल्यानंतर २०२२-२३ मध्ये निव्वळ घरगुती बचत १४,१६,४४७ कोटी रुपये झाली. २०१८-१९ नंतर हा सर्वात कमी आकडा आहे, तेव्हा हा आकडा १४,९२,४४५ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२० मध्ये १५ लाख ४९ हजार ८७० कोटी रुपयांवरून २०२-२१ मध्ये तो २३ लाख २९ हजार ६७१ कोटींवर पोहोचला. पुढील वर्षी तो १७ लाख १२ हजार ७०४ कोटींवर आला. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये तो १४ लाख १६ हजार कोटींवर आला. अशा प्रकारे निव्वळ बचत ३ वर्षात ९ लाख कोटी रुपयांनी कमी झाली.