Lokmat Money >गुंतवणूक > SBI Annuity Plan: FD सारखीच पण थोडी वेगळी! स्टेट बँक दर महिन्याला व्याजासह पैसे देणार, चांगली योजना

SBI Annuity Plan: FD सारखीच पण थोडी वेगळी! स्टेट बँक दर महिन्याला व्याजासह पैसे देणार, चांगली योजना

एफडी म्हणजे ग्राहक त्यांचे पैसे ठराविक मुदतीसाठी गुंतवू शकतो, मॅच्युरिटीनंतर तो ग्राहक व्याजासकट ती रक्कम परत मिळवितो. तोवर त्याला थांबावे लागते. इथे तसे नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 01:02 PM2022-11-03T13:02:33+5:302022-11-03T13:03:11+5:30

एफडी म्हणजे ग्राहक त्यांचे पैसे ठराविक मुदतीसाठी गुंतवू शकतो, मॅच्युरिटीनंतर तो ग्राहक व्याजासकट ती रक्कम परत मिळवितो. तोवर त्याला थांबावे लागते. इथे तसे नाही...

SBI Annuity Plan: Similar to FD but slightly different! State bank will pay monthly with interest, good plan for investment | SBI Annuity Plan: FD सारखीच पण थोडी वेगळी! स्टेट बँक दर महिन्याला व्याजासह पैसे देणार, चांगली योजना

SBI Annuity Plan: FD सारखीच पण थोडी वेगळी! स्टेट बँक दर महिन्याला व्याजासह पैसे देणार, चांगली योजना

आजकाल पैसा कसा कमवावा, कष्टाने कमविलेला पैसा कुठे गुंतवावा यावरून मोठी डोकेफोड करावी लागते. अनेकजण यामध्ये कन्फ्यूज होतात आणि नको तिथे पैसे गुंतवून बसतात. म्युच्युअल फंड सध्याची सर्वात पसंतीची गुंतवणूक आहे. असे असले तरी पोस्ट खाते आणि अन्य काही बँका तुम्हाला चांगले पैसे देऊ शकतात. एसबीआयने दर महिन्याला तुम्हाला इन्कम मिळण्याची एफडी सारखीच चांगली योजना आणली आहे. 

एसबीआयच्या अ‍ॅन्युईटी प्लानमध्ये पैसे गुंतवून तुम्ही दर महिन्याला चांगला इन्कम करू शकता. एफडी म्हणजे ग्राहक त्यांचे पैसे ठराविक मुदतीसाठी गुंतवू शकतो, मॅच्युरिटीनंतर तो ग्राहक व्याजासकट ती रक्कम परत मिळवितो. तोवर त्याला थांबावे लागते. परंतू, अ‍ॅन्युईटी प्लानमध्ये ग्राहक जी रक्कम जमा करतो त्यावरील व्याज त्याला दर महिन्याला दिले जाते. 

एसबीआयच्या वेबसाइटनुसार, अ‍ॅन्युइटी प्लॅन अंतर्गत ग्राहक एका निश्चित कालावधीसाठी एकरकमी रक्कम जमा करू शकतो. ही मुळ रक्कम समान हप्त्यांमध्ये विभागली जाते, तसेच त्या रकमेसह व्याजही दिले जाते. अ‍ॅन्युइटी प्लॅनच्या मॅच्युरिटीवर ही रक्कम शून्य होते. म्हणजेच वर्षासाठी तुम्ही पैसे गुंतविले तर दर महिन्याला १२ हप्ते आणि त्यावरील व्याज तुम्हाला परत दिले जाते. 
SBI अॅन्युइटी प्लॅनमध्ये दिलेला व्याज दर FD प्रमाणेच असतो. एसबीआय अॅन्युइटी प्लॅनमध्ये पैसे गुंतवायचे असल्यास तुम्हाला 5 वर्षांसाठी दरमहा बँकेकडून 1000 रुपये घेण्यासाठी किमान 60,000 रुपये जमा करावे लागणार आहेत. यावर बँक व्याजही देणार आहे. 

Web Title: SBI Annuity Plan: Similar to FD but slightly different! State bank will pay monthly with interest, good plan for investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.