SBI Bank 31 March 2024 Financial Deadline: आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना, म्हणजेच मार्च महिना अनेकांसाठी महत्वाचा असतो. या महिन्यात सर्व प्रकारची आर्थिक कामे पूर्ण करावी लागतात. अनेकजण कर वाचवण्यासाठी विविध ठिकाणी गुंतवणूक करतात. तुम्हीदेखील कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल, तर 31 मार्च 2024 पर्यंतची संधी आहे. तुम्ही SBI च्या योजनेत गुंतवणूक करू शकता.
1. SBI अमृत कलश योजना
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI ची अमृत कलश योजना ही एक विशेष FD योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे. बँक त्यावर 7.10 टक्के व्याज देते. ही SBI ची एक खास योजना आहे, ज्यात 400 दिवसांच्या FD वर 7.10 टक्के व्याज दिले जाते. बँकेच्या वेबसाइटनुसार, कोणताही व्यक्ती अमृत कलश स्पेशल स्कीममध्ये गुंतवणूक करू शकतो. या योजनेत गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक आणि सहामाही व्याज मिळवू शकतो.
2. SBI WeCare FD योजना
SBI ने WeCare FD योजनेत गुंतवणुकीची अंतिम मुदत 31 मार्च 2024 पर्यंत ठेवली आहे. SBI त्यांच्या WeCare FD वर ग्राहकांना सर्वोत्तम व्याज देते. बँक कोणत्याही FD वर सामान्य ग्राहकापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50 अधिक व्याज देते. SBI Wecare वर 7.50% व्याज मिळते. योजनेअंतर्गत, किमान 5 वर्षे आणि कमाल 10 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते.
3. SBI होम लोन रेट
स्टेट बँक ऑफ इंडिया 31 मार्च 2024 पर्यंत गृहकर्जावर ऑफर देत आहे. ज्या ग्राहकांचे CIBIL स्कोअर 750-800 पेक्षा जास्त आहे, त्यांना 8.60 टक्के व्याजाने कर्ज दिले जाईल. इतर वेळी गृहकर्जाचे व्याजदर 9.15 टक्के आहे.