SBI FD Interest Rate 2024: बँकांची फिक्स्ड डिपॉझिट स्कीम(FDs) ही अशी योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार बाजारातील जोखीम न घेता निश्चित उत्पन्न मिळवू शकतो. यामध्ये, गुंतवणूकदारांना ठेवीच्या वेळी मिळालेल्या व्याजाची माहिती असते, त्यामुळे ठराविक कालावधीत एकरकमी रक्कम जमा करणे हा एक चांगला पर्याय आहे. बँका वेळोवेळी वेगवेगळ्या मुदतीच्या व्याजदरांचा आढावा घेतात आणि त्या वाढवतात किंवा कमी करतात. अलीकडेच, देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) काही निवडक कालावधींच्या एफडीवरील (FDs) दरांमध्ये 0.50 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. एसबीआयनं 27 डिसेंबर 2023 पासून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर (SBI FD Interest Rate 2024) हे लागू केले आहे. एसबीआयमध्ये 5 लाख रुपये गुंतवणून 1, 2, 3 आणि 5 वर्षात तुम्ही किती परतावा मिळवू शकता हे पाहू.
एका वर्षासाठी ₹5 लाखावर किती व्याज1 वर्षाच्या मुदतीच्या ठेवींवर एसबीआयचे व्याजदर 6.80 टक्के आहेत. दरम्यान, 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवरील व्याजदर 5.75 टक्क्यांवरून 6 टक्के करण्यात आला आहे. तुम्ही 1 वर्षासाठी 5 लाख रुपये जमा केले असल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 5,34,876 रुपये मिळतील. म्हणजे तुम्हाला व्याजातून 34,876 रुपये निश्चित उत्पन्न मिळेल.
2 वर्षांसाठी ₹5 लाखावर किती व्याज?SBI ने 2 वर्षांच्या एफडीवरील व्याजदर 7 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. तुम्ही 2 वर्षांसाठी 5 लाख रुपये जमा केले असल्यास, तुम्हाला 5,74,440 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला व्याजातून 74,440 रुपये निश्चित उत्पन्न मिळेल.
3 वर्षांसाठी ₹5 लाखावर किती व्याज?एसबीआयनं 3 वर्षांच्या एफडीवरील व्याजदर 6.50 टक्क्यांवरून 6.75 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. म्हणजेच ठेवींच्या दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तुम्ही 3 वर्षांसाठी 5 लाख रुपये जमा केले असल्यास, तुमची मॅच्युरिटी रक्कम 6,11,196 रुपये असेल. जुन्या व्याजदरानुसार ही रक्कम 6,06,703 रुपये असेल. अशा प्रकारे, तुम्हाला नवीन दरांवर 4493 रुपये अधिक व्याज मिळेल.
5 वर्षांसाठी ₹5 लाखावर किती व्याज?एसबीआयचे 5 वर्षांच्या एफडीवरील व्याजदर 6.50 टक्के आहेत. जर तुम्ही 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर तुमचे निश्चित उत्पन्न 6,90,209 रुपये असेल. अशा प्रकारे तुम्हाला 1,90,209 रुपये व्याज मिळेल.
तुम्ही 5 वर्षांच्या एफडीवर आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर कपातीचा लाभ घेऊ शकता. सर्व ग्राहकांना 5 वर्षांच्या टॅक्स सेव्हर एफडीचा लाभ मिळतो. दरम्यान, FD वर मिळणारं व्याज करपात्र आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे.