रिकरिंग डिपॉझिट (RD) हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक मानला जातो. यामध्ये तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करत राहता. यामध्ये, तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम जमा करून त्यावर आकर्षक व्याजदर घेऊन खूप चांगला परतावा मिळवू शकता. तसंच, दरमहा ठराविक रक्कम जमा करून तुम्ही तुमच्या काही आपत्कालीन गरजांसाठी पैसे वाचवू शकता. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे वेगवेगळ्या बँकांमध्ये आरडीवर मिळणाऱ्या व्याजदराची माहिती असली पाहिजे.
SBI आरडी इंटरेस्ट रेट
SBI एक वर्ष ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी रिकरिंग डिपॉझिटवर 6.80 टक्के ते 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर ऑफर करते. एसबीआयमध्ये किमान मंथली डिपॉझिट 100 रुपयांपासून आणि त्याच्या पटीत सुरू होते. दुसरीकडे, जर तुम्ही तुमच्या आरडीचा हप्ता भरण्यास उशीर केला तर तुम्हाला त्यावर दंड भरावा लागतो. दुसरीकडे, तुम्ही सलग सहा हप्ते चुकवल्यास, तुमचं खातं मुदतीपूर्वी बंद केलं जातं.
HDFC बँक आरडी इंटरेस्ट रेट
HDFC बँक 6 महिन्यांच्या कालावधीसाठी 4.50 टक्क्यांपर्यंत व्याज देते आणि 9 महिने, 12 महिने आणि 15 महिन्यांसाठी देत असलेला व्याजदर अनुक्रमे 5.75 टक्के, 6.60 टक्के आणि 7.10 टक्के आहे. 24 महिने, 27 महिने, 36 महिने, 39 महिने, 48 महिने, 60 महिने, 90 महिने आणि 120 महिन्यांच्या कालावधीसाठी एचडीएफसी बँक 7 टक्के व्याजदर देते.
ICICI बँक आरडी इंटरेस्ट रेट
ICICI बँक सामान्य नागरिकांसाठी 4.75 टक्के ते 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.25 टक्के ते 7.50 टक्क्यांदरम्यान व्याजदर देते. ICICI बँकेच्या वेबसाइटनुसार, आरडी ठेवी 6 महिने ते 10 वर्षांच्या कालावधीपर्यंत उपलब्ध असतील.
येस बँक आरडी इंटरेस्ट रेट
येस बँक 6 महिने ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी 6.10 टक्के ते 7.75 टक्क्यांपर्यंत व्याज देते. उशीरा पेमेंट केल्यास बँक 1 टक्के दंड आकारेल.
PNB आरडी इंटरेस्ट रेट
पंजाब नॅशनल बँक 6 महिने ते 120 महिन्यांच्या कालावधीसह 4.50 टक्के ते 7.25 टक्क्यांपर्यंत व्याज देते. तुम्ही तुमचे आरडीचे हप्ते जमा करण्यास उशीर केल्यास तुम्हाला प्रत्येक 100 रुपयांवर 1 रुपये दंड भरावा लागेल.