SBI Vs Post Office RD: सॅलराईड लोकांना गुंतवणुकीसाठी एकाच वेळी मोठी रक्कम जमवणं थोडं कठीण आहे. बहुतांश सॅलराईड लोक दर महिन्याला त्यांच्या पगारातून काही पैसे वाचवतात आणि ते बचत योजनेत गुंतवतात. अशा लोकांना लक्षात घेऊन रिकरिंग डिपॉझिट स्कीम म्हणजेच आरडी तयार करण्यात आली आहे.
तुम्ही यामध्ये दर महिन्याला पैसे गुंतवता आणि त्यानंतर तुम्हाला निश्चित व्याज मिळतं. आरडी एक वर्ष ते १० वर्षांसाठी असते. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), एचडीएफसी बँक (HDFC Bank) यासह अनेक बँकांव्यतिरिक्त, पोस्ट ऑफिस देखील आरडी स्कीम ऑफर करत आहे. आज आपण पोस्ट ऑफिस आणि एसबीआय बँकेच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीमबद्दल जाणून घेऊ.
एसबीआय रिकरिंग डिपॉझिट
एसबीआय एक वर्ष ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी आरडी ऑफर करत आहे. एसबीआय सामान्य नागरिकांना रिगरिंग डिपॉझिटवर ६.५% ते ७% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७% ते ७.५% व्याज देत आहे. हे दर १५ फेब्रुवारी २०२३ पासून लागू आहेत.
एसबीआयचे व्याजदर
- १ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी ६.८०% (सर्वसाधारण) ७.३०% (ज्येष्ठ नागरिक)
- २ वर्षे ते ३ वर्षांपेक्षा कमी ७% (सर्वसाधारण) ७.५०% (ज्येष्ठ नागरिक)
- ३ वर्षे ते ५ वर्षांपेक्षा कमी ६.५० (सर्वसाधारण) ७% (ज्येष्ठ नागरिक)
- ५ वर्षे आणि १० वर्षांपर्यंत ६.५० (सर्वसाधारण) ७.५०% (ज्येष्ठ नागरिक)
पोस्ट ऑफिस आरडी
पोस्ट ऑफिस आरडी ५ वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह येते. पोस्ट ऑफिस आरडी योजना ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजाचा लाभ देत नाही. हे दर १ जुलै २०२३ पासून लागू आहेत. पोस्ट ऑफिस आरडीमध्ये ५ वर्षांसाठी ६.५ टक्के व्याज दिलं जातं.
आरडीवर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस कापला जातो. आरडीवर मिळालेल्या व्याजदरांवर १० टक्के टीडीएस लागू आहे. जर आरडीवर एक महिन्याचे व्याज १० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर टीडीएस कापला जाईल.
कुठे मिळतोय अधिक फायदा
एसबीआय ज्येष्ठ नागरिकांना आरडीवर जास्त व्याज देत आहे. या ठिकाणी गुंतवणूक करणं फायदेशीर ठरू शकतं. त्याचप्रमाणे, जर सामान्य लोक आरडीमध्ये एक किंवा 2 वर्षांसाठी गुंतवणूक करत असतील तर एसबीआय अधिक व्याज देत आहे.