फिक्स्ड इन्कममध्ये स्वारस्य असलेल्या गुंतवणूकदारांनाएसबीआय म्युच्युअल फंड एक नवी स्कीम घेऊन आला आहे. यामध्ये फिक्स्ड डिपॉझिटच्या तुलनेत अधिक फायदा मिळत आहे. शनिवारी, 10 डिसेंबर रोजी SBI म्युच्युअल फंडाने SBI लाँग ड्युरेशन फंड लाँच केला आहे. ही एक ओपन एंडेड टेट स्कीम आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाची नवीन स्कीम प्रामुख्याने डेट आणि मनी मार्केट इन्स्ट्रूमेंटमध्ये गुंतवणूक करून दीर्घकाळापर्यंत नियमित रोख प्रवाह राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
तथापि, SBI लाँग ड्युरेशन फंडमध्ये गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होईल याची शाश्वती नाही. गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवावे की बँक एफडी योजनांच्या बाबतीत, आरबीआयच्या ठेव विमा हमीद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींच्या सुरक्षिततेची हमी दिली जाते.
चांगले रिटर्न देणाऱ्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक कराएसबीआय म्युच्युअल फंडाचे डेप्युटी एमडी आणि चीफ बिझनेस ऑफिसर डीपी सिंग म्हणाले की, एसबीआय लाँग ड्युरेशन फंडच्या माध्यमातून प्रामुख्याने दीर्घकालीन सरकारी सिक्युरिटीज आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक केली जाईल. या योजनेत रीसेट करण्यासाठी 7 वर्षांचा मॅकॉले कालावधी असेल. “गुंतवणूकदारांना सरकारी सिक्युरिटीजच्या अशा उच्च दर्जाच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून फायदा होऊ शकतो जेथे फंडाचा कार्यकाळ त्यांच्या गुंतवणूकीच्या उद्दिष्टांशी सुसंगत असेल,” असेही ते म्हणाले.
न्यू फंड ऑफर (NFO) उद्या म्हणजेच सोमवार 12 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2022 पर्यंत खुली असेल. 21 डिसेंबर 2022 रोजी म्युच्युअल फंड युनिट्सचे वाटप केले जाईल. SBI लाँग ड्युरेशन फंडामध्ये तुलनेने जास्त व्याजदर जोखीम आणि मध्यम क्रेडिट जोखीम असेल.
(टीप - या लेखात केवळ माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)