Fixed Income Instruments: शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे त्रस्त गुंतवणूकदारांसाठी अन्य ठिकाणी गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत. ज्यात तुम्ही पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवू शकता. येथे अशा अनेक गुंतवणुकीच्या पर्यायांची माहिती दिली आहे, ज्यात परतावा जवळपास निश्चित असतो. त्याचबरोबर त्यांच्यातील गुंतवणूकही सुरक्षित आहे. मॅच्युरिटीवर चांगला परतावा तर मिळू शकतोच, शिवाय भांडवल सुरक्षित ठेवत दरमहा ठराविक उत्पन्नाची ही व्यवस्था करता येते.
Bank Fixed Deposits (FDs)
फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) हा सर्वाधिक पसंतीचा पर्याय आहे. यामध्ये गुंतवणुकीच्या वेळी व्याजदर निश्चित केला जातो आणि गुंतवणूकदारांना निश्चित परतावा मिळतो. त्यात जमा झालेल्या पैशात ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर सरकारी गॅरंटी असते, ज्यामुळे गुंतवणूक अधिक सुरक्षित होते.
Recurring deposits (RDs)
रिकरिंग डिपॉझिटमध्ये (RD) नियमितपणे कमी रक्कम जमा केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. यात सामान्य बचत ठेवींपेक्षा जास्त व्याज मिळतं. आरडीमुळे बचतीची सवय लागते आणि चांगला परतावाही मिळतो. थोड्या पैशात याची सुरुवात करता येत असल्यानं कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठीही हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरतो.
Public Provident Fund (PPF)
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही दीर्घकालीन बचत योजना आहे. त्याची मॅच्युरिटी १५ वर्षांची आहे, जी प्रत्येकी पाच वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढविली जाऊ शकते. सध्या गुंतवणुकीवर वार्षिक ७.१ टक्के दरानं व्याज मिळत आहे. पीपीएफमधील योगदानावर ही कर वजावट मिळते आणि मॅच्युरिटीवर मिळणारे पैसेही करमुक्त असतात. त्यामुळे निवृत्तीची ही उत्तम योजना ठरते.
Post Office Monthly Income Scheme (POMIS)
पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग्ज मंथली इनकम अकाउंटद्वारे (पीओएमआयएस) द्वारे मासिक कमाईची व्यवस्था केली जाऊ शकते. यात कमीत कमी रक्कम जमा करता येऊ शकते आणि सध्या यावर ७.४ टक्के दरानं व्याज मिळतं. ज्यांना आपले भांडवल सुरक्षित ठेवून नियमित उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करायचे आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
RBI Floating Rate Savings Bonds
रिझर्व्ह बँकेच्या फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँडची मुदत सात वर्षांची असून त्यावर सध्या ८.०५ टक्के व्याज मिळत आहे. तुम्ही कमीत कमी १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. यामध्ये तुम्ही आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट पोर्टलच्या माध्यमातून पैसे गुंतवू शकता.
National Savings Certificates (NSCs)
सरकार राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र जारी करते. सध्या त्यावर ७.७ टक्के दरानं व्याज आणि कलम ८० सी अंतर्गत कर वजावट मिळत आहे. त्याचा मॅच्युरिटी पीरियड ठरलेला असतो आणि परतावाही जवळपास सुरक्षित असतो.